‘दोघे मुंबई उपनगरातील एकाच भागात राहतात. दोघांचे २०२१ पासून प्रेमसंबंध होते. चौधरी धमक्या देत असल्यानं तरुणी २९ जानेवारीला त्याला भेटण्यास तयार झाली. तरुणीनं संवाद संपुष्टात आणल्यानं, लग्नास नकार दिल्यानं चौधरी संतापला. तरुणी लॉजवर आल्यानंतर त्यानं तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले. तो खोलीत अनेक ठिकाणी थुंकला आणि त्यानंतर तरुणीला थुंकी चाटायला लावली. ही थुंकी चाट. त्यामुळे तू माझ्या कॉल्सला प्रत्युत्तर न देण्याची चूक करणार नाहीस, असं म्हणत आरोपी पीडितेवर ओरडला,’ अशी माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
चौधरीकडून होत असलेला अत्याचार थांबल्यानंतर पीडितेनं कसंबसं स्वत:ला सावरलं. ती घरी परतली. तिनं घडलेला प्रकार मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीनं काशिमिरा पोलीस ठाण्यात येऊन आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३७७, ३५४-ब, ३२३, ३२४, ५०६ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चौधरीचा फोन बंद असून तो फरार आहे. तो अधूनमधून फोन सुरू करतो आणि सातत्यानं आपला ठावठिकाणा बदलतो, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
youth rapes ex, एक्स फोन घेईना, रिप्लाय देईना; तरुणानं लॉजवर नेलं, रुमभर थुंकला; तरुणीसोबत धक्कादायक प्रकार – youth assaults keeps physical relation forcefully ex for ignoring texts calls
मिरारोड: माजी प्रेयसीला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात काशिमिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोघांचे धर्म वेगळे असल्यानं प्रेयसीनं संबंध संपवले. त्यामुळे तरुण नाराज झाला. त्यानं तरुणीला फोन, मेसेज केले. मात्र तिच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यानं प्रियकर संतापला. त्यानं २९ जानेवारीला माजी प्रेयसीला एका लॉजवर बोलावलं. तिथे तिच्यावर अत्याचार केले. या संपूर्ण प्रकरणाचं चित्रिकरण करुन याबद्दल वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेनं तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.