रत्नागिरी/राजापूर : कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर येथे सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. एका जीपने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून निघालेले पत्रकार शशिकांत वारी हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी दुचाकीस्वाराला तातडीने कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा कंपनीची थार ही चारचाकी गाडी व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर महिंद्रा थार गाडीचा चालक घटनास्थळावरून पळाला आहे. ही गाडी आंबेरकर नामक व्यक्तीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र अपघाताच्या वेळी गाडी नेमकं कोण चालवत होते त्याचा तपास राजापूर पोलीस करत आहेत. या अगोदर या परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले असून यावरून पुढील तपास तातडीने सुरू करण्यात आला आहे.

पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५ वर्ष, रा. कशेळी राजापूर) कोदवली येथील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरून बाहेर पडत असताना हा भीषण अपघात झाला आहे. पंपाबाहेर पडत असताना समोरून भरधाव वेगात येत असलेल्या महेंद्रा थार गाडी (क्रमांक एमएच 08 एएक्स 6100) या गाडीच्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

शारीरिक आणि आर्थिक आरोग्य वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?
या भीषण अपघातात दुचाकीस्वार वारीशे हे खाली पडले तर त्यांची दुचाकी महिंद्रा धार गाडीबरोबर फरफटत सुमारे 200 ते 250 फूट पुढे गेली. या भीषण अपघातात वारीशे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.

येथील स्थानिकांनी त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करता हलवलं होतं, पण प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना तातडीने कोल्हापूर येथे हलवण्यात आलं आहे. या भीषण अपघाताचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी राजापूर येथे येऊन घटनास्थळाची पाहणी करून या सगळ्या अपघाताची माहिती घेतली आहे.

हेही वाचा : बाबा कुठे गेले? शोधत लेक पेट्रोल पंपाजवळ पोहोचली, झाडाकडे बघून हंबरडा फोडला… ए आईsss

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत. या अपघातातील पळालेल्या ड्रायव्हरचा शोध सुरू आहे.

हेही वाचा : मिट्ट काळोखात कार विहिरीत कोसळली, मदतीला कोणी नाही, पुण्यात तरुणाचा बुडून मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here