रोहित पवारांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी रोहित यांनी राज्यात करोनाचं संकट असून तुम्ही राज्यभर दौरे करत आहात, त्याची चिंता वाटते, असं पवारांना सांगितलं. त्यावर राज्यातील जनतेच्या मनातील भीती घालवण्यासाठीच मला बाहेर फिरावं लागत असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचं रोहित यांनी सांगितलं. रोहित यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या वयातही राज्यभर फिरणाऱ्या शरद पवार साहेबांना आज भेटलो. नेहमीप्रमाणे ही भेटही ऊर्जा देणारी होती. यावेळी त्यांच्या फिरण्याबाबत मी काळजी व्यक्त केली असता, सरकार काम करतंच आहे, पण लोकांची भीती घालवणं व काही ठिकाणची परिस्थिती प्रत्यक्ष पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे मी फिरतो, असं पवारांनी सांगितल्याचं रोहित यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी रोहित यांनी या वयातही राज्याच्या दौरा करणाऱ्या पवारांना हॅट्स ऑफ साहेब म्हणून सलामही केला आहे.
राज्यात करोनाचं संकट आल्यानंतर शरद पवार यांनी सुरुवातीच्या काळात स्वत: फेसबुक लाइव्ह करून राज्यातील जनतेशी संवाद साधून सरकारच्या कामांची माहिती देतानाच जनतेच्या समस्याही जाणून घेत त्या सोडवल्या. तसेच राज्यातील जनतेला मानसिक आधार देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यानंतर रोज त्यांच्या ट्विटरवरून त्यांनी करोनापासून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्याचा धडाका लावला. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वारंवार बैठका घेऊन रोखण्यासाठी आणि राज्याचं अर्थचक्र सुरू करण्यासाठी त्यांनी वारंवार मार्गदर्शनही केलं. हे करत असतानाच त्यांनी राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला भेटी देण्यास सुरुवात केली. आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतानाच राष्ट्रवादीकडून जनतेला देण्यात येणाऱ्या मदतीचाही ते आढावा घेत होते.
करोनाच्या संकटातही शरद पवार हे पायाला भिंगरी लावून फिरत असल्याने रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. तसं ट्विटही त्यांनी केलं होतं. जनतेच्या हितासाठी तुम्ही राज्यभर फिरणारच आहात. याबाबत कुणी नाही म्हटलं तरी तुम्ही ऐकणार नाहीत. म्हणूनच लोकांना विनंती आहे की, पवारांना भेटत असताना आपण स्वत:हून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, असं रोहित यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
These are actually great ideas in concerning blogging.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.