सावंतवाडी (सिंधुदुर्ग): सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे संजू परब हे विजयी झाले असून त्यांनी शिवसेनेचे उमेदवार बाबू कुडतरकर यांचा पराभव केला आहे. संजू परब यांनी या निवडणुकीत ३१३ मतांनी विजय मिळवला. शिवसेनेच्या पराभवामुळे खासदार यांच्या कोकण भाजपमय करण्याचा संकल्पासाठी हे मोठे यश असल्याचे मानले जात असून शिवसेनेचे आमदार यांना हा पराभव म्हणजे मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे

सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे बाबू कुडतरकर हे ३०१ मतांनी आघाडीवर राहिले. तर दुसऱ्या क्रमांकाची मते भारतीय जनता पक्षाचे संजू परब यांनी प्राप्त झाली. तर तिसऱ्या क्रमांकावर होते अॅड. दिलीप नार्वेकर. अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर, अमोल साटेलकर आणि बबन साळगावर हे पिछाडीवर राहिले. मात्र, दुसऱ्या फेरीत संजू परब यांनी २५० मतांची आघाडी मिळवली. ही आघाडी त्यांनी तिसऱ्या फेरीत कायम राखली. अखेर त्यांचा ३१३ मतांनी विजय झाला.

दिपक केसरकरांना धक्का

ही निवडणूक जशी भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती, तशीच ती शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्यासाठीही महत्त्वाची मानली गेली होती. नारायण राणे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर कोकण भाजपमय करण्याचा संकल्प सोडला होता. या निकालानंतर सावंतवाडीत नारायण राणे यांचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक निकाल

दुसरी फेरी

मिलिंद कीर (राष्ट्रवादी काँग्रेस): ९७२
दीपक पटवर्धन (भाजप): १६१३
प्रदीप साळवी (शिवसेना): २७१५

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here