chinchwad ncp candidate, अखेर चिंचवडचा सस्पेन्स संपला! जयंत पाटलांनी केली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची घोषणा – finally the suspense of chinchwad by election is over jayant patil announced the ncp candidate nana kate name
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. मात्र इच्छुकांच्या गर्दीमुळे उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करणं राष्ट्रवादीने अद्याप टाळलं होतं. आता अखेर राष्ट्र्वादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली असून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.
‘महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे,’ असंही जयंत पाटील यांनी उमेदवाराची घोषणा करताना म्हटलं आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या रिंगणात असताना आता राष्ट्रवादीनेही आपल्या उमेदवाराची घोषणा केल्याने या मतदारसंघात रंगतदार लढत होणार, हे निश्चित झालं आहे. बाळासाहेब थोरातांचे गटनेतेपद अडचणीत? पोटनिवडणुकीनंतर निर्णयाची शक्यता
दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम युतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी काल शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपचा उमेदवार बदलू शकतो का?
पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी ‘डमी’ अर्ज भरला आहे. मात्र पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप याच राहणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. उमेदवार बदलू शकतो का, या प्रश्नावर ‘इथे बदल नाही’, असंही त्यांनी सांगितले.