अमरावती : निसर्गाचा लहरीपणा व बाजारभावातील तफावत यामुळे शेतकरी एकूणच संकटात सापडला आहे. अशातच राज्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाणही वाढत आहे. या सगळ्यात मोर्शी शहरातील सुलतानपुरा येथील रहिवासी युवा शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण मोतीराम ठाकरे (२४) हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील कामे आटोपून सायंकाळी घरी आला. त्यानंतर त्याने वृद्ध आई घरी नसल्याचे पाहून गळफास लावला. आई घरी परतल्यावर हा धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यावर मोर्शी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्रवणला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मुंबईत भर बाजारात तिच्या ओठांवर फिरवली १०० ची नोट अन् म्हणाला…; रोडरोमिओला अखेर घडली अद्दल
श्रवण याच्याकडे अडीच एकर शेती असून त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. परंतु, सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तो तणावात राहत होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी श्रवणचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

एका महिलेचा २ पुरूषांसोबत सुरू होता भलताच व्यवसाय; रंगेहात पकडताच पोलिसही चक्रावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here