उस्मानाबाद : शेतातील ज्वारीला पाणी देण्यासाठी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव येथे घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच इटकळ औट पोस्ट येथील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आणि नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान, मृत शेतकरी शरणाप्पा जमादार यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. शेतकरी पिता-पुत्राचा निधनाने निलेगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.