हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मार्गावरील आंबा चौंडी फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री रुग्णवाहिका व ट्रकच्या भीषण आपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर रुग्णवाहिका चालकासह ६ जण गंभीर जख्मी झाले आहेत. उपचारासाठी जात असताना झालेल्या अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अपघाताचा तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील राहुली बु. येथील राघोजी मारोती डोरले यांना नांदेड येथे उपचारासाठी रुग्णवाहिका (जी टी १८ बी टी ४७७३ ) मध्ये नातेवाईक घेऊन जात होते. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री वसमत औंढा नागनाथ मार्गावरील आंबा चौंडी फाट्याजवळ रुग्णवाहिका व ट्रक ( क्र एम एच २६ ऐडी ७२७२ ) चा भीषण अपघात झाला. या आपघातात कलावती राघोजी डोरले (वय ४५ ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नांदेड येथे उपचारादरम्यान राघोजी मारोती डोरले ( ५१) यांचा आज रोजी पहाटे मृत्यू झाला. दोघे मृत पती-पत्नी होते.

गर्लफ्रेंडचे तुकडे करण्याआधी खेळला मास्टर गेम; वेबसीरिज पाहिली, इंटरनेटवरून असं सर्च केलं की पोलिसही हैराण
अपघातात रूग्णवाहिका चालक अक्षय साळवे रा वसई, तानाजी राघोजी डोरले वय २६, नागोराव बळीराम डोरले २२, गणेश संतोष शिंदे वय १८, सचिन नामदेव डोरले वय २४, सर्व रा राहुली बु., मुंजाजी आनंदराव मोधे वय ३६, रा फुलधाबा ता औढा हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन मोरे, तुकाराम आम्ले, संतोष पटवे,बालाजी जोगदंड, गजानन भोपे यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे नांदेड येथे रवाना केले आहे. पतीस नांदेड येथे उपचारासाठी नेतांना पतीपत्नीचा मृत्यू झाल्याने राहुली बु.गावावर शोककळा पसरली आहे.

एका महिलेचा २ पुरूषांसोबत सुरू होता भलताच व्यवसाय; रंगेहात पकडताच पोलिसही चक्रावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here