मुंबई : सेन्सेक्स कंपन्यांमध्ये सोमवारी अल्ट्राटेक सिमेंटचा समभाग ७.१७ टक्के वधारला. त्याचवेळी आदित्य बिर्ला समूहाने एकत्रित नफ्यामध्ये ३८ टक्के घट झाल्याचे जाहीर करूनही भांडवल बाजारात या समूहातील कंपन्यांनी आपली पत राखण्यात यश मिळवले. टीसीएस, कोटक महिंद्र बँक, महिंद्र अॅण्ड महिंद्र, मारुती, इंडसइंड बँक व बजाज ऑटो यांचे समभाग ४.६९ टक्क्यांपर्यंत वधारले.

सेन्सेक्समधील आयसीआयसीआय बँक, नेस्ले, एशियन पेंट्स, ओएनजीसी व आयटीसी या कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र घसरण झाली. कालच्या सत्रात
जवळपास १३१५ शेअर्सनी वृद्धी घेतली, १३०० शेअर्स घसरले तर १५१ शेअर्स स्थिर राहिले. अल्ट्राटेक सिमेंट (७.०२ टक्के), कोटक महिंद्रा बँक (४.७०टक्के), टाटा मोटर्स (४.४२ टक्के), टीसीएस (४.६९ टक्के), आणि ग्रासिम इंडस्ट्रिज (४.५९ टक्के) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. तर दुसरीकडे, भारती इन्फ्राटेल (१.६२ टक्के), आयसीआयसीआय बँक (१.७७ टक्के), ओएनजीसी (०.८७ टक्के), नेस्ले (१.४२ टक्के) आणि एशियन पेंट्स (१.२२ टक्के) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी काल सकारात्मक व्यापार केल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.

देशांतर्गत इक्विटी बाजारात सकारात्मक संकेत दिसल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आजच्या व्यापारी सत्रात भारतीय रुपया ७४.८३ वर स्थिर होता. आशियाई आणि युरोपियन बाजाराने अमेरिका-चीन दरम्यानच्या तणावामुळे सोमवारी संमिश्र ट्रेंड दर्शवला. नॅसडॅकचे शेअर्स १.६७ टक्के, हँगसेंगचे शेअर्स ०.६९% नी वाढले. तर निक्केई २२५ चे शेअर्स ०.२६ टक्क्यांनी घसरले. तर दुसरीकडे, एफटीएसई १०० चे शेअर्स ०.१८ टक्क्यांनी वाढले तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.८४ टक्क्यांनी घसरले.

मेरिको लिमिटेड: मेरिको लिमिटेड कंपनीचे स्टॉक्स ३.११ टक्क्यांनी वाढले व त्यांनी ३६१.३५ रुपयांवर व्यापार केला. कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, मजबूत उत्पन्न कमावले. याकाळात कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात २३.२ टक्क्यांची वृद्धी कमावली.

कोटक महिंद्रा बँक: बँकेचे २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहितील उत्पन्न स्थिर राहिले. त्यामुळे कोटक महिंद्र बँकेचे शेअर्स ४.७०टक्क्यांनी वाढले व त्यांनी १,३८४ रुपयांवर व्यापार केला.

भारती इन्फ्राटेल: भारती इन्फ्राटेलचे शेअर्स १.६२ टक्क्यांनी घसरले व त्यांनी १९१.१० रुपयांवर व्यापार केला. कारण कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील निव्वळ नफा २१ टक्क्यांनी घसरला.

टाटा मोटर्स: आजच्या व्यापारी सत्रात टाटा मोटर्सच्या स्टॉक्समध्ये ४.४२ टक्क्यांची वाढ झाली व त्यांनी १०६.२० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने थेअरी बोलोर यांना जग्वार लँड रोव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

हेवेल्स इंडिया: कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीचा एकत्रित निव्वळ नफा ६३.८७ टक्क्यांनी घसरला. तसेच कंपनीच्या थेट विक्रीतही ४५.४ टक्क्यांची घट दिसून आली. परिणामी हेवेल्स कंपनीचे स्टॉक्स ३.०६ टक्क्यांनी घसरले व त्यांनी ५७७.०० रुपयांवर व्यापार केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here