पाटणा: पोलिसांना चकवा देण्यासाठी तस्कर काय करतील याचा नेम नाही. गेल्याच वर्षी आलेल्या पुष्पा चित्रपटानंतर अनेक ठिकाणी रक्तचंदनाची तस्करी पकडली गेली. त्यातील अनेकांनी पुष्पा स्टाईलमध्ये रक्तचंदन चोरी करण्याचा प्रयत्न केला. झुकेगा नही म्हणणाऱ्या अनेक पुष्पांना पोलिसांनी गजाआड केलं. त्यानंतर आता पोलिसांनी एका दारु तस्कराला अटक केली आहे. त्यानं वापरलेली पद्धत पाहून अनेकांच्या डोक्याला झिणझिण्या आल्या.

बिहारमध्ये दारुबंदी आहे. त्यामुळे तस्कर आपलं उखळ पांढरं करुन घेत आहेत. तस्करी जोरात सुरू आहे. वैशाली जिल्ह्यात एकाला तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाईकवरून सुसाट निघालेल्या तरुणाला पाहून पोलिसांना संशय आला. त्यांनी त्याला रोखलं. तरुणानं बाईकच्या सीटच्या खाली दोन लीटरची बाटली ठेवली होती. त्या बाटलीत पेट्रोल होतं. या बाटलीतून एक पाईप बाहेर आला होता. तो इंजिनला जोडण्यात आला होता. बाईक बाटलीतील पेट्रोलवर धावतेय, मग पेट्रोलच्या टाकीत काय आहे, असा प्रश्न पोलिसांना पडला.
हळद लागली, नवरी सजली; आंघोळीला गेली, ती बाहेर आलीच नाही; कुटुंबीयांनी दार ठोठावलं तर…
पोलिसांनी तरुणाला पेट्रोलची टाकी उघडायला सांगितली. पेट्रोलची टाकी दारुनं भरली होती. दारु तस्करीच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी तरुणाला अटक केली. मनजीत असं त्याचं नाव आहे. त्याचं शिक्षण आठवीपर्यंतच झालं आहे. दारुनं भरलेली टाकी पाहून पोलिसांनी धक्काच बसला. सध्या संपूर्ण बिहारमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाया सुरू आहेत. दारु तस्करीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क पोलिसांच्या मदतीनं धडक कारवाया करत आहे. मात्र तरीही तस्कर नवनव्या क्लृप्त्या लढवून तस्करी करत आहेत.

उत्पादन शुल्क विभागाला टिप मिळाली अन्…

राघोपूर दियारामधून एक जण बाईकवरून दारुची तस्करी करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या बाईकचा नंबरदेखील मिळाला. त्याच आधारे पोलिसांनी बाईकस्वार तरुणाला रोखलं आणि टाकीतून चालणारी तस्करी पकडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here