forest ranger dies, चित्कार ऐकू येऊ लागले; गावकऱ्यांची शेती वाचवण्यासाठी फॉरेस्ट रेंजर सरसावला; अनर्थ घडला – forest ranger trampled to death by elephants in andhra pradesh
विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशच्या पार्वतीपुरम मान्यम जिल्ह्यात एका तरुण फॉरेस्ट रेंजरचा दुर्देवी अंत झाला आहे. जंगली हत्तींनी फॉरेस्ट रेंजरला चिरडलं. गावात घुसणाऱ्या हत्तींना रोखण्यासाठी २६ वर्षांचा लक्ष्मीनारायण सरसावला. मात्र हत्तींनी त्यांना चिरडून मारलं. पार्वतीपुरम मान्यममधील पासीकुडी गावाच्या बाहेर सोमवारी रात्री ही घटना घडली.
वन विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असणारा लक्ष्मीनारायण हत्तींचे चित्कार ऐकून शेतात गेला. हत्ती कापसाच्या शेताच्या दिशेनं येत असल्याचं त्यानं पाहिलं. हत्तींना रोखण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. हाती मशाल घेत त्यानं हत्तींना वंशधारा नदीच्या दिशेनं पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र हत्तींचा कळप त्याच्यावर चाल करून आला. त्यांनी लक्ष्मीनारायणला चिरडलं. हत्तींना गावात शिरण्यासापासून रोखण्यासाठी लक्ष्मीनारायण प्रयत्नांची शर्थ केली. मात्र त्यात त्याला जीव गमवावा लागला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. हळद लागली, नवरी सजली; आंघोळीला गेली, ती बाहेर आलीच नाही; कुटुंबीयांनी दार ठोठावलं तर… हत्तींच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लक्ष्मीनारायणचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मीनारायणचा श्रीकाकुलम जिल्ह्याचा रहिवासी होता. या घटनेमुळे ग्रामीण भागात घबराट पसरली आहे. वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्याचं आश्वासन ग्रामस्थांना दिलं. गेल्या काही दिवसांपासून हत्तींनी या परिसरात उच्छाद मांडला आहे. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात हत्तींच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. सुसाट पळणारी बाईक थांबवली, पोलिसांना संशय; टाकी उघडायला लावली, आत पेट्रोल नव्हतंच; मग काय? गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये याच जिल्ह्यातील कालिकोटा गावात जंगली हत्तीनं एका शेतकऱ्याला चिरडून संपवलं. ४८ वर्षांचा शेतकरी पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेला होता. त्यावेळी हत्तीनं त्याच्यावर हल्ला केला. त्याला पायदळी तुडवलं. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हत्तींचे हल्ले वाढत चालल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण आहे.