अकोला : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर देशमुखांनी थेट धमकी देणाऱ्या व्यक्तीला प्रतिआव्हान दिले. त्यानुसार मुंबईतील नरिमन पॉईंटला आज मंगळवारी सकाळी ते आपल्या समर्थकांसह दाखल झाले होते. मरेन पण दिलेला शब्द फिरवणार नाही, असं म्हणत आमदार नितीन देशमुखांनी तब्बल दीड तास नारायण राणेंसह त्यांच्या समर्थकांची वाट बघितली. मात्र कुणीही तोपर्यंत आलं नाही. यावेळी नितीन देशमुख यांनी कुठल्याही प्रकारचे पोलीस संरक्षण घेतलं नव्हतं.

नितीन देशमुख यांना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाने दोन वेगवेगळ्या फोन नंबर्सवरून धमकी देण्यात आली होती. ५ जानेवारी म्हणजेच रविवारी सकाळी साडेअकरा वाजता एका अज्ञात व्यक्तीने आमदार देशमुखांना धमकीचा फोन केला. यावर नितीन देशमुखांनी आपण मंगळवारी सकाळी १० वाजता मुंबईला नरिमन पाँईंटला भेटायला येत असल्याचं प्रतिआव्हान धमकी देणाऱ्या व्यक्तीला दिलं होतं. दरम्यान, मिळालेल्या धमकीनंतरही अतिरिक्त पोलीस संरक्षण घेणार नाही, असंही ते म्हणाले होते. तसंच देशमुखांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगेंना धमकीच्या या फोनची कल्पना दिली होती.

थोरातांसोबत नाना पटोले जुळवून घेण्याच्या तयारीत? नाराजीच्या चर्चेबद्दल मांडली सविस्तर भूमिका

राणे विरुद्ध देशमुख वाद का सुरू झाला?

सहा दिवसांपूर्वी नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर नितीन देशमुखांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं होतं. यावेळी नितीन देशमुखांनी राणे कुटुंबीयांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर आमदार नितीन देशमुख यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकीला प्रतिआव्हान देत देशमुख हे आधी म्हटल्याप्रमाणे तसेच ठरलेल्या जागेवर भेटण्यासाठी आज सकाळी ८ वाजता मुंबईतील नरिमन पॉईंटला दाखल झाले. तब्बल दीड तास नारायण राणेंसह त्यांच्या समर्थकांची प्रतीक्षा केली. पण तोपर्यंत कोणीही येऊन फिरकले नाही ,असंही देशमुख म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here