कल्याण : कल्याणजवळील अंबिवलीच्या वस्तीमध्ये शिरून इराणी टोळीच्या सदस्याच्या मुसक्या आवळणे म्हणजे पोलिसांपुढे मोठे दिव्य असते. पोलीस आल्याची कुणकुण लागताच या वस्तीमधील सर्वच रहिवासी पोलिसांवर हल्ला चढवितात. सोनसाखळी चोरीच्या एका अट्टल आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल २६ पोलिसांची तीन पथके तयार केली. विशेष म्हणजे तरीही प्रतिकार होण्याची भीती असल्याने पोलीस डॉक्टर बनले आणि चक्क रुग्णवाहिकेतून वस्तीत शिरले आणि ऑपरेशन आंबिवली फत्ते केले.

दहिसरमध्ये डिसेंबर आणि जानेवारीच्या महिन्यात सोनसाखळी चोरीच्या तीन घटना घडल्या. याप्रकरणी तपासामध्ये मोहम्मद सांगा उर्फ झाकीर फरजत सय्यद हा आरोपी इराणी टोळीशी संबंधित असल्याची माहिती मिळाली. आरोपीची पार्श्वभूमी पाहता पोलीस उपायुक्त अजय बन्सल यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली, चारकोप, मालाड आणि एमएचबी पोलीस ठाण्यातील २६ निवडक पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली. या पथकांकडे दोन खासगी कार बरोबरच दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या. वस्तीमधील चहाच्या टपरीवर बसलेल्या झाकीर याला पकडण्यासाठी रुग्णवाहिका घेऊन पोलिसांच्या एक पथक आत शिरले. रुग्णवाहिका घेऊनही इराणी रहिवाशांना पोलीस आल्याची कुणकुण लागलीच. झाकीरने आरडाओरड करताच सर्व रहिवाशी घराबाहेर पडले आणि पोलिसांना प्रतिकार करू लागले. या गर्दीतच पोलिसांनी मोठ्या चपळाईने झाकीर याला ताब्यात घेऊन रुग्णवाहिकेत टाकले.

मुंबईत भर बाजारात तिच्या ओठांवर फिरवली १०० ची नोट अन् म्हणाला…; रोडरोमिओला अखेर घडली अद्दल
पोलीस झाकीर याला घेऊन जात असल्याचे समजताच रहिवाशांनी रुग्णवाहिकेवर तुफान दगडफेक केली. झाकीर तावडीतून निसटून जाऊ नये यासाठी पोलिसांनी तिन्ही पथके एकत्र आली. दगडांचा होणार वर्षाव कसाबसा चुकवत मार्ग काढत असतानाच जमावाने मोठी रुग्णवाहिकेचा मार्ग अडवला.

पोलिसांनी दुसऱ्या पथकाकडे असलेली लहान रुग्णवाहिका जवळ आणली आणि मोठ्या चपळाईने झाकीर याला त्यामध्ये टाकून अरुंद जागेतून मार्ग काढला. या कारवाईदरम्यान काही पोलीस जखमी देखील तर एका अधिकाऱ्याच्या हाताला प्फ्रॅक्चर झाले. मात्र तरीही आरोपी झाकीरला पकडून मुंबईत आणण्यात आले. झाकीर याच्यावर मुंबई, दिल्ली, राजस्थान, यूपी आणि गुजरातसह इतर राज्यांमध्ये २७ हुन अधिक गुन्हे दाखल आहेत.

वडिलांच्या वॉशिंग सेंटरमध्ये गाडी धुताना काळाचा घाला, १४ वर्षीय मुलाचा मन सुन्न करणारा शेवट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here