अविनाश हेमंत गोरे (वय ६९) व वैशाली हेमंत गोरे (रा. ए ४ गंगा विष्णू संकूल, कर्वेनगर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अविनाश यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश व त्यांची पत्नी हे दोघे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. या आजारपणाला कंटाळून अविनाश यांनी पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: ओढणीच्या साह्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी दोन दिवस दरवाजा न उघडल्यामुळे नागरिकांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अलंकार पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, सोमवारीच पिंपरी-चिंचवडमधील भालेकर नगर, पिंपळे गुरव परिसरात एका महिलेने आपल्या पोटच्या ४ वर्षीय मुलीची भिंतीवर डोके आपटून हत्या केली होती. त्रास देते म्हणून तिनं मुलीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी त्रास देत असल्यानं तिच्या आईनं पोटच्या चार वर्षांच्या मुलीचा भिंतीवर डोके आपटून आणि मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. सासूच्या दशक्रिया विधीसाठी कुटुंबीय बाहेर गेले होते. त्यावेळी तिनं मुलीची हत्या केली. सविता दीपक काकडे (वय २२, रा. भालेकर नगर, पिंपळे गुरव, सांगवी) या निर्दयी मातेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर रिया दीपक काकडे (वय ४) असं मृत मुलीचं नाव आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times