काय आहे संपूर्ण प्रकरण
आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जादूटोण्यामुळे हे पोट जन्माला आलं होतं, त्यामुळे तिने बाळाला जिवंतच पुरलं. दरम्यान, हे पती-पत्नी उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. अनिता असं महिलेचं नाव असून तिने शुक्रवारी एका मुलीला जन्म दिला. ही महिला वारंवार डिप्रेशनमध्ये असते. मुलीच्या जन्मामुळे तिला खूप त्रास होत होता. त्यामुळे तिने नदी परिसरात जाऊन खड्डा खोदून बाळाला जिवंतच त्यामध्ये पुरले. महिलेच्या पतीला हा सगळा प्रकार कळताच त्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तक्रार दाखल करत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतलं असून तिची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
जादूटोण्यामुळे झाली मुलगी…
महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले की, मुलगी झाल्यापासून पत्नी विचारात होती. ती एकटीच बडबड करू लागली होती. तिने एकदाही मुलीला प्रेमाने जवळ घेतलं नाही. जादूटोण्यामुळे मूल गर्भात आलं, असा भ्रम अनिताला होता. यावरून तिने असं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, पोलीस अनिताची चौकशी करत असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.