नोएडा: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात ९ महिन्यांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं आहे. पोलिसांनी मृत तरुणाच्या प्रेयसीसह संपूर्ण कुटुंबाला अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. १३ जून २०२२ रोजी रंजीत नावाच्या तरुणाचा मृतदेह सापडला होता. या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

नऊ महिन्यांपूर्वी बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिपयाना गावातील तलावात एक मानवी सांगाडा सापडला होता. पोलिसांनी सांगाडा बाहेर काढून तपास सुरू केला. अखेर ९ महिन्यांनंतर पोलिसांना या प्रकरणाचं गूढ उकलण्यात यश आलं. ‘रणजीत आणि नेहा यांची मैत्री ९ वर्षांपूर्वी झाली. एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून दोघे एकत्र आले. रणजीतला नेहाचा नंबर सोसायटीच्या लिफ्टमध्ये लिहिलेला दिसला. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं,’ अशी माहिती मध्य नोएडाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विशाल पांडे यांनी दिली.
सुसाट पळणारी बाईक थांबवली, पोलिसांना संशय; टाकी उघडायला लावली, आत पेट्रोल नव्हतंच; मग काय?
रणजीत आणि नेहा यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. मात्र नेहाच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे रणजीत संतापला. त्यानं काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ नेहाच्या भावाला पाठवले. यानंतर नेहाच्या कुटुंबानं रणजीतची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार आठ महिन्यांपूर्वी नेहाच्या कुटुंबीयांनी रणजीतला लग्नाच्या बोलणीसाठी घरी येण्याचं आमंत्रण दिलं. रणजीत नेहाच्या घरी गेला. तिथे त्याला खूप दारू पाजण्यात आली. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील रणजीतची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह गावातील तलावात फेकण्यात आला.
हळद लागली, नवरी सजली; आंघोळीला गेली, ती बाहेर आलीच नाही; कुटुंबीयांनी दार ठोठावलं तर…
रणजीतच्या कुटुंबीयांनी १३ जून २०२२ रोजी रणजीत बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. २६ जानेवारी २०२३ रोजी पोलिसांना चिपयानाच्या लोको शेडजवळ एका तलावात मानवी सांगाडा सापडला. त्याची डीएनए चाचणी करण्यात आली. या प्रकरणात फॉरेन्सिकचीही मदत घेण्यात आली. पोलिसांनी रणजीतच्या कुटुंबीयांची चौकशी केली. त्यात त्यांनी नेहाच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला. रणजीत नेहाच्या घरी गेला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. त्यानंतर नेहाच्या कुटुंबीयांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here