जळगाव: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिध्द आहे. देशात जळगावच्या केळीची मागणी वाढली असली मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने जळगावच्या केळीला सोन्याचे भाव मिळत आहेत. केळी २२०० रुपये क्विंटल या दराने केळी शेतकऱ्यांकडून खरेदी होत आहे. बाजारात ७० रुपये डझन या दराने केळीची विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ७० रुपये देवून सुध्दा बाजारात दर्जेदार केळी मिळत नसल्याचे चित्र आहे. केळीच्या वाढलेल्या या दरामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे., गेल्या काही महिन्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना विविध संकटाच्या मालिकेला सामोरे जावे लागले. यात चक्री वादळ,गारपीट आणि सीएमवी वायरसचा झालेला प्रादुर्भाव याचा थेट परिणाम केळीवर झाला. केळीवर पडलेल्या सीएमवी व्हायरस या आजारामुळे एकूण क्षेत्रापैकी जळगाव जिल्हयात पंधरा ते वीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यामुळे केळी उत्पादन कमी प्रमाणात होत आहे. त्याच बरोबर यंदा थंडीचा लांबलेला सिझन हा सुद्धा केळी निसावनीसाठी अडचणीचा ठरला. यामुळे केळी उत्पादनात मोठी घट आली आहे.जळगावच्या केळीला मागणी वाढली आहे, तर उत्पादन कमी असल्याने पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने केळीच दर वाढले आहेत. ऑगस्ट महिन्यात १२०० रुपये क्विंटल एवढे दर मिळत होते. त्यापूर्वीच्या काही दिवसांचा विचार केला तर ७०० आणि ८०० रुपये क्विंटल या दराने केळी व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात होती. गेल्या महिन्यांपासून हे दर स्थिर असल्याने लागवडीचाही खर्च निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता.काहींनी ठिकाणी शेतकऱ्यांनी लागवड केलेली केळी उपटून फेकली होती. मात्र आता केळीचे दर २२०० रुपये क्विंटलपर्यंत पोहचले आहे. तर दुसरीकडे केळीची निर्यात वाढल्याने जळगाव जिल्ह्यात आज सर्व सामान्य जनतेला केळी मिळणे दुरापस्त झाले आहे. यंदा जळगाव मध्ये सध्यस्थितीत ७० रुपये डझन इतका विक्रमी भाव केळीला मिळत आहे. ७० रुपये देवून सुध्दा दर्जेदार केळी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना या दरवाढीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here