दिल्ली: मेहंदीमुळे हाताचं सौंदर्य खुलतं. घरात काही शुभकार्य असलं की महिलावर्ग मोठ्या हौशेनं मेहंदी काढतात. त्यासाठी अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागरणं होतात. कोणाची मेहंदी किती रंगली याची चर्चाही रंगते. मात्र हाताचं सौंदर्य खुलवणाऱ्या मेहंदीमुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर? दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात असाच प्रकार समोर आला आहे.

मेहंदीच्या वासामुळे फिट्स येत असल्याची समस्या एका ९ वर्षांच्या मुलीला उद्भवली आहे. क्लिनिकल न्युरोफिजियोलॉजीच्या अहवालातून ही केस प्रकाशित झाली आहे. मेहंदी काढल्यानंतर मुलीला फिट्स येत असल्याची तक्रार घेऊन पालक सर गंगाराम रुग्णालयात पोहोचले. मेहंदी काढल्यानंतर अवघ्या २० सेकंदांत मुलगी बेशुद्ध होऊन कोसळली. वर्षभरानंतर तिनं हातावर पुन्हा एकदा मेहंदी काढली. त्यामुळे पालकांनी मुलीला घेऊन रुग्णालय गाठलं.
तास उलटून गेला, एकजण माडावर हालचाल न करता बसलाय; पादचाऱ्याचा पोलिसांना फोन अन् मग…
न्युरोलॉजी विभागाचेय वरिष्ठ सर्जन पी. के. सेठी सध्या या केसवर काम करत आहेत. ‘ही जगातील अनोखी घटना आहे. मेहंदीच्या वासाचा असा परिणाम पहिल्यांदाच समोर दिसला आहे. सुगंधामुळे सातत्यानं फिट्स येतात ही असामान्य बाब आहे,’ असं सेठी म्हणाले. रुग्णालयात प्रयोग म्हणून मुलीच्या उजव्या हातावर मेहंदी काढण्यात आली. मेहंदीला एक विशिष्ट वास असतो. मेहंदी काढलेला हात ९ वर्षीय मुलीनं छातीजवळ नेताच तिला फिट्स येऊ लागल्या. हात छातीच्या जवळ जाताच मुलगी बेचैन झाली. तिच्या हातापायाला पेटके आले. तिने अचानक डोळे फिरवले.
हळद लागली, नवरी सजली; आंघोळीला गेली, ती बाहेर आलीच नाही; कुटुंबीयांनी दार ठोठावलं तर…
मेहंदीचा सुगंध येताच फिट्स येण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहत असल्याचं डॉक्टरांनी सांगितली. हा प्रकार असामान्य असल्याचं ते म्हणाले. मुलीला मेहंदीच्या संपर्कात येऊ देऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी पालकांना दिला आहे. मुलीची प्रकृती आता स्थिर आहे. मुलीवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर आता तिला कोणताही त्रास होत नाही. मात्र मुलीवरील उपचार अद्याप पूर्ण झालेले नाहीत, असं डॉक्टर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here