दिल्ली: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे. श्रद्धाला संपवल्यानंतर आफताब पुनावालानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले. आफताबनं दिलेल्या कबुली जबाबामुळे अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. आफताबनं हत्येच्या तीन-चार महिन्यांनंतर श्रद्धाचा चेहरा खराब करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच त्यानं तिच्या विल्हेवाट लावली.

दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची सविस्तर माहिती आहे. त्यात आफताबचा कबुली जबाब आहे. त्यानुसार आफताबनं श्रद्धाची हत्या केल्यानंतर तीन चार महिन्यांनी तिचा चेहरा आणि डोक्यावरचे केस ब्लो टॉर्चनं जाळण्याचा प्रयत्न केला. श्रद्धाची ओळख कधीच पटू नये यासाठी आफताबनं ब्लो टॉर्चचा वापर केला.
तास उलटून गेला, एकजण माडावर हालचाल न करता बसलाय; पादचाऱ्याचा पोलिसांना फोन अन् मग…
श्रद्धाची हत्या लपवण्यासाठी आफताबनं तिला ‘व्हर्च्युअली’ जिवंत ठेवलं. त्यासाठी त्यानं तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट स्वत:च्या मोबाईलवर लॉग इन केलं. श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडरच्या मेसेजला आफताबनंच रिप्लाय दिले. श्रद्धाच्या हत्येचं कारणदेखील आरोपपत्रातून स्पष्ट झालं आहे. एका ऑनलाईन डेटिंग ऍपच्या माध्यमातून श्रद्धाची ओळख एका मुलासोबत झाली. त्याला भेटण्यासाठी श्रद्धा १७ मे २०२२ रोजी गुरुग्रामला गेली होती. सकाळी घरातून निघालेली श्रद्धा रात्री परतली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रद्धा घरी आली. तेव्हा यावरून श्रद्धा आणि आफताबचा वाद झाला. भांडणादरम्यान आफताबचा पारा चढला आणि त्यानं श्रद्धाला संपवलं.
लव्ह, सेक्स और धोका! मिस्ड कॉलनं सूत जुळलं; बेपत्ता प्रियकराचं गूढ मानवी सांगाड्यानं उलगडलं
या प्रकरणात पोलिसांनी ७५ दिवसांत आरोपपत्र दाखल केलं. पोलिसांनी आफताबची नार्को टेस्ट केली. त्याआधी त्याची पॉलिग्राफी टेस्टदेखील करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र तयार केलं. आफताब श्रद्धाला मारहाण करायचा, ती अतिशय हिंसक होता, अशी माहिती श्रद्धाच्या मित्रांनी दिलेल्या जबाबातून स्पष्ट झाल्या आहेत. आफताब सतत वाद घालायचा, श्रद्धाला मानसिक आणि शारिरीक त्रास द्यायचा, अशी माहिती तिच्या मित्रांच्या चॅटमधून पुढे आलेली आहे. श्रद्धा आणि आफताबमध्ये १८ मे रोजी असाच वाद झाला. तो वाद टोकाला गेला आणि आफताबनं श्रद्धाला संपवलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here