the angry husband ends the life of his wife

पती आठवडी बाजारातून घरी आल्यावर झाला पत्नीशी वाद

बीड: बीड तालुक्यातील ढाकेफळ शिवारातील चौसा वस्तीवर पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर खुनी पती पोलीस ठाण्यात हजर झाला. ही धक्कादायक घटना आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

आरती भगवान थोरात (वय- २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती भगवान शाहूराव थोरात यास पोलिसांनी अटक केली आहे. भगवान शाहूराव थोरात हा आठवडी बाजारातून घरी आला. यावेळी पत्नी आरती सोबत त्याचा वाद झाला. संतापलेल्या भगवानने पत्नी आरतीला खाली पाडून कुऱ्हाडीने गळ्यावर वार केला. यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर भगवान थोरात युसूफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. येथे ठाणे अंमलदारांना त्याने हत्येची माहिती दिली.

क्लिक करा आणि वाचा- अदानी समूहाच्या शेअर्समध्ये LIC चे मोठे नुकसान झाले का? ; सरकारने केला मोठा खुलासा

त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. संतापाच्या भरात केलेल्या कृत्याने दोन मुले आईच्या मायेला पोरकी झाली आहेत.

क्लिक करा आणि वाचा- डोंबिवलीत मोठा आवाज झाला, परिसरात पसरला उग्र वास, महानगर गॅसची पाइपलाइन फुटली, हजारो किलो गॅस वाया

मुले शाळेत, आई-वडील बाहेरगावी

आरती थोरात आणि भगवान थोरात यांना दोन लहान मुलं असून ते प्राथमिक शाळेत होते. जालना जिल्ह्यातील नातेवाईकाच्या लग्नाला भगवानची आई गेली होती. तर दिंद्रुड येथील एका नातेवाईकच्या कार्यक्रमाला वडील आणि भाऊ गेले होते. त्यामुळे पती, पत्नीतील वाद सोडवायला कोणीच नसल्याने हा अनर्थ घडला, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. सर्व नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा- मला तुझ्या चटईवर झोपायला दे ना…; डोळाही मारायचा, विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला ठोकल्या बेड्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here