एकतर्फी प्रेम प्रकरणातून २३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील सोलम कोंड येथे घडली आहे. सतीश भरत पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. तो धामणे येथील रहिवासी आहे. त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तीने नकार दिल्याने सतीश दारूच्या आहारी गेला आणि नैराश्यातून घरात नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेत त्याने आपलं जिवन संपवलं.
चाकरमान्यांसाठी मोठी बातमी; आता ठाण्यातून सीएसएमटी थेट मेट्रोप्रवास, पूर्ण प्लान समजून घ्या
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने जीवन संपवल्याचे स्टेटस ठेवलं असल्याचं त्याच्या मित्र मंडळींकडून सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यृची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, कोकणात रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध ठेवले, तिला लग्नाचं आमिष देत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केली. त्यामुळे या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे