गेले अनेक दिवस लाखो विद्यार्थी उत्कंठेने ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होती, तो दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होत आहे. करोनाचे सावट राज्यातल्या कोणत्या महत्त्वाच्या परीक्षेवर आले तर ते दहावीच्या. बारावीची परीक्षा तोवर उलटून गेली होती, मात्र दहावीच्या भूगोल विषयाच्या मुख्य विषयासह काही अन्य विषयांची परीक्षा लॉकडाऊन पुकारण्यात आला त्यावेळी शिल्लक होती. परिणामी यंदा अनेक वर्षांनंतर प्रथमच भूगोलाचा पेपर रद्द करण्याची वेळ राज्य मंडळावर आली. विद्यार्थ्यांना या विषयाचे सरासरी गुण दिले जाणार असून त्यासह उर्वरित विषयांचा निकाल आज जाहीर होत आहे…निकालाचे सर्व ताजे अपडेट्स तुम्ही येथे जाणून घ्या…

– थोड्याच वेळात निकाल होणार जाहीर

– राज्य मंडळाची ११ वाजता पत्रकार परिषद

– कोणत्या वेबसाइटवर पाहता येणार निकाल?

– कसे दिले जाणार भूगोलाचे गुण?

अन्य विषयांना लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची सरासरी काढून, त्यानुसार भूगोल विषयाचे गुण दिले जातील. तसेच दिव्यांगासाठी असणाऱ्या कार्यशिक्षण विषयाचे गुण ही सरासरी पद्धतीने दिले जाणार आहेत.

– भूगोलाचा पेपर

– दहावीची परीक्षा ३ मार्च २०२० ला सुरू झाली होती. याचदरम्यान करोनाच्या प्रादुर्भावाला सुरूवात झाली. दरम्यान, करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २३ मार्चला होणारा भूगोलाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला होता. करोना प्रादुर्भावातच दहावीची परीक्षा सुरू होती. २१ मार्च रोजी १०वीचा इतिहासाचा पेपर झाला. त्यानंतर मात्र २३ मार्च रोजीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला असल्याचे शिक्षण मंडळाने जाहीर केले. दरम्यान, करोना संक्रमण वाढत निघाल्याने अखेर १२ एप्रिल रोजी भूगोलाचा पेपर रद्द केला असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

– शिक्षणमंत्र्यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

– निकालास विलंब

गेल्या वर्षी ७ जून २०१९ रोजी दहावीचा निकाल घोषित करण्यात आला होता. यंदा कोविड – १९ संसर्गाच्या संकटामुळे निकालाला जवळपास दोन महिन्यांचा विलंब झाला आहे.

– २०१९ मध्ये कसा होता दहावीचा विभागनिहाय निकाल?

कोकण- ८८.३८ टक्के
कोल्हापूर- ८६.५८ टक्के
पुणे- ८२.४८ टक्के
नाशिक- ७७.५८
मुंबई- ७७.०४ टक्के
औरंगाबाद – ७५.२०
लातूर- ७२.८७
अमरावती- ७१.९८
नागपूर- ६७.२७

– मागील वर्षीचा निकाल खूप कमी

२०१८-१९ या वर्षीचा म्हणजेच मागील वर्षीचा निकाल खूप कमी लागला होता. मागील वर्षी प्रथमच विद्यार्थी नव्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देत होते. त्याचा परिणाम निकालावर जाणवला आणि निकाल तब्बल १२.३१ टक्क्यांनी घसरला होता. २००६ नंतरचा हा सर्वात कमी निकाल होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here