कल्याण : प्रेमातून हत्या आणि आत्महत्या होण्याच्या घटना आपण रोज पाहतो. असाच एक प्रकार मुंबईच्या कल्याणमध्ये समोर आला आहे. इथे एका अल्पवयीनु मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याप्रकरणी अटक केलेल्या तरुणाने जामिनावर सुटल्यानंतर असं काही केलं की यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे मुलीच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका २४ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीशी पळून जात लग्न केले. यानंतर तरुणी गर्भवती होती. पण मुलीच्या पालकांनी तरुणावर गुन्हा दाखल केल्याने त्याला अटक झाली. जामिनावर सुटल्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तरुणाने असं टोकाचं पाऊल का उचललं? याचा पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.

बाईकवर तरुणी बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली अन्…’ Valentine आधीच प्रेमी युगुलाचा खुल्लम खुल्ला प्यार व्हायरल
दरम्यान, आत्महत्या केलेल्या तरुणाच्या काकांनी मुलीच्या घरच्यांविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुलीच्या वडिलांना अटक केली. मुलीच्या घरचे हे तरुणाला खोट्या केसमध्ये अडकवण्याची आणि पैशांची मागणी करत असल्याची माहिती तरुणाच्या काकांनी पोलिसांना दिली आहे. यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुलीच्या पालकांविरुद्ध दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण एका खासगी कंपनीत कामाला होता. तो कल्याणमधील रहिवासी असून २१ जानेवारी रोजी विष प्राशन करत त्याने जीवन संपवले. तरुणाचे उल्हासनगर इथल्या १७ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. मुलीच्या घरच्यांना यासंबंधी कळताच दोघांनी पळून जात लग्न केले. पण यानंतर मुलीच्या घरच्यांनी तरुणाला त्रास देत पैशांची मागणी करत त्याला धमकी देण्यास सुरुवात केली.

दोघांच्या लग्नानंतर मुलीच्या घरच्यांनी तिला पुन्हा घरी बोलावले आणि तरुणाविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यानंतर तरुणाला अटक झाली होती. पण जामिनावर सुटल्यानंतर त्याने थेट आपलं आयुष्यच संपवलं. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे तरुणी गर्भवती असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांना तरुणाला त्रास देण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

एका महिलेचा २ पुरूषांसोबत सुरू होता भलताच व्यवसाय; रंगेहात पकडताच पोलिसही चक्रावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here