परभणी: धावत्या बसमध्ये वाहकाला हार्ट अटॅक आल्यानंतर प्रवाशांनी प्रसंगावधान राखलं. चालकाला बसच्या बाहेर आणून प्रवाशांनी त्याची छाती दाबली, त्याला वारा घातला. वाहक शुद्धीवर येईपर्यंत प्रवाशांनी त्यांचे प्रयत्न अखंडपणे सुरुच ठेवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटना लातूर-बार्शी महामार्गावरील असल्याचा दावा केला जात आहे.

चालत्या एसटी बसमध्ये वाहकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी बसमधील प्रवाशांनी सतर्कता दाखवली. चालकानं बस थांबवताच प्रवासी वाहकाला घेऊन खाली उतरले. त्याला रस्त्याशेजारी झोपवून प्रवाशांनी सीपीआर दिला. वाहकाची छाती दाबून त्याला शुद्धीवर आणलं. प्रवाशांनी दाखवलेल्या या सतर्कतेचं कौतुक होत आहे.

नेमकं काय झालं?
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्यानं धावत असताना वाहकाला हार्ट अटॅक आला. त्यामुळे चालकाने बस थांबवली. बसमधील प्रवाशांनी वाहकाला खाली उतरून जमिनीवर झोपवले. त्यानंतर प्रवाशांनी वाहकाची छाती दाबण्यास सुरुवात केली. काही प्रवासी वाहकाची छाती चोळत होते. आजूबाजूला उभ्या असलेल्या प्रवाशांनी वाहकाचे हात पाय पकडले. त्यानंतर काही मिनिटांत वाहक शुद्धीवर आला. बसमधले प्रवासी वाहकासाठी अक्षरश: देवदूत ठरले. त्यांनी वेळीच मदत केल्यानं वाहकाचा जीव वाचला.
अशी औलाद नसलेली बरी! वडिलांवर अंत्यविधी करण्यासाठी मुलाची संतापजनक अट; लेकीनं दिला मुखाग्नी
लातूर जिल्ह्यातील व्हिडिओ असल्याचा दावा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पंढरपूर- औरंगाबाद बस बार्शी-लातूर मार्गावरून धावत असताना महामार्गावरील जामगाव या ठिकाणी धावत्या बसमध्येच वाहकाला हार्ट अटॅक आला असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. प्रवाशांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here