नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिली कसोटी उद्या गुरुवारपासून नागपूर येथे सुरू होत आहे. चार सामन्यांची ही मालिका भारतीय संघासाटी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. नागपूर कसोटीत काही मोठे विक्रम होण्याची शक्यता आहे.

१) विराट कोहली-

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ६४ धावांची गरज आहे. ही कामगिरी करताच तो २५ हजारचा टप्पा पार करणारा जगातील फक्त सहावा फलंदाज ठरेल. ३४ वर्षीय विराटने ४९० मॅच खेळल्या असून त्यात ५३.७४च्या सरासरीने २४ हजार ९३६ धावा केल्या आहेत. भारताकडून आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ हजार धावांचा टप्पा पार केलाय.

वाचा- अदानी प्रकरणात वीरेंद्र सेहवागची उडी; असं बोलण्याची हिम्मत कोणीच दाखवली नाही

२) आर अश्विन-

स्टार ऑफ स्पिनर आर अश्विनने कसोटीत आतापर्यंत ४४९ विकेट घेतल्या आहेत. ४५०चा टप्पा पार करण्यासाठी त्याला फक्त एका विकेटची गरज आहे. जर पहिल्या कसोटीत त्याने एक विकेट घेतली तर कसोटीत भारताकडून सर्वात वेगाने ४५० विकेट घेणारा तो गोलंदाज ठरेल.

३) स्टीव्ह स्मिथ-

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने पहिल्या कसोटीत शतक केले तर तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करेल. या ट्रॉफीत त्याने १४ कसोटीतील २८ डावात ८ शतक केली आहेत. सचिनने ३४ कसोटीत ९ शतक केली आहेत. स्मिथने दोन शतक केली तर तो सचिनचा विक्रम मोडू शकतो.

वाचा- विराट कोहलीच्या ट्विटची पोलिसांकडून चौकशी; उपायुक्त म्हणाले, आम्ही त्यांच्याकडे…

४)चेतेश्वर पुजारा-

भारताचा कसोटी स्टार चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० सामन्यात १८९३ धावा केल्या आहेत. नागपूर कसोटीत त्याने १०७ धावा केल्या तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत २ हजारहून अधिक धावा करणारा तो चौथा भारतीय आणि एकूणात सहावा फलंदाज ठरेल.

वाचा-1st Test ऑस्ट्रेलियाला टेन्शन द्यायच्या नादात टीम इंडियामध्ये गोंधळ; संघ व्यवस्थापनासमोर…

५) नाथन लियोन-

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लियोनने भारताविरुद्धच्या २२ कसोटीत ९४ विकेट घेतल्या आहेत. जर पहिल्या कसोटीत त्याने ६ विकेट घेतल्या तर भारताविरुद्ध कसोटीत १०० पेक्षा अधिक विकेट घेणारा तो इतिहासातील फक्त तिसरा गोलंदाज होईल. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत बळींचे शतक करणारा तो अनिल कुंबळेनंतरचा दुसरा गोलंदाज असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here