: उत्तर प्रदेशच्या आग्र्यात एका नवविवाहितेनं भलताच कारनामा केला आहे. लग्न करून मरुधर एक्स्प्रेसनं सासरी निघालेल्या नवरीनं तिच्यासोबत ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या सासरच्या मंडळींना दिलं आणि ती ट्रेनमधून फरार झाली. घटनेनंतर सासरच्या मंडळींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. सकाळी ७ वाजता रामफल गावाजवळ असलेल्या रेल्वे रुळांच्या शेजारी तीन जण आढळून आले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांची मदत केली. त्यांनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या सोबत नवरी प्रवासी करत होती. तिनं त्यांना नमकीन खाऊ घातलं. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. लग्न समारंभ आटोपून एक कुटुंब मरुधर एक्स्प्रेसनं वाराणसीहून जयपूरला जात होतं. कुटुंबासोबत नवविवाहित वधू होती. तिनं कुटुंबाला नमकीनमध्ये विषारी पदार्थ मिसळून दिला. त्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडलं. त्यांना रामफल गावाजवळ रेल्वे रुळांशेजारी उतरवण्यात आलं. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना आग्रा फोर्ट स्टेशनला आणलं. बेशुद्धावस्थेत त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मरुधर एक्स्प्रेसमध्ये कुटुंबावर विषप्रयोग झाल्याची माहिती मंगळवारी सकाळी मिळाली. त्या कुटुंबातील सदस्यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती आग्रा रेल्वे मंडळाचे जनसंपर्क अधिकारी प्रशस्ती श्रीवास्तव यांनी दिली. ‘आमच्यासोबत नवविवाहिता होती. तिनं आम्हाला नमकिन खाऊ घातलं. त्यात विषारी पदार्थ मिसळण्यात आले होते,’ असं पीडित कुटुंबानं सांगितलं. नवविवाहिता लग्नामुळे आनंदी नव्हती. ती नाखूश होती. त्यामुळेच तिनं हा प्रकार केला असावा अशी शक्यता आहे. सध्या आरपीएफकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here