या घटनेत हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सद्दाम शेख तजमूल तोफाजून शेख (३१) असे असून तो पनवेलच्या आदई गावात सोनाऊल हक या मित्रासोबत रहात होता. तसेच त्याच्यासोबत तो फळविक्रीचा व्यवसाय करत होता. मेहबुब आलम हा मृत सद्दाम शेख याच्या गावाकडील नातेवाईक असून तो पनवेलमधील मिराज चित्रपटगृहालगतच्या सिडकोच्या उद्यानाजवळ नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. मेहबुब आलम व सद्दाम शेख यांच्यामध्ये अधूनमधून बोलणे होत होते. मात्र गेल्या आठवड्यात सद्दाम आणि मेहबुब यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्यामुळे गेल्या शनिवारी दुपारी मेहबुब याने सद्दामला फोनवरून शिवीगाळ करून त्याला आदई गावात येऊन मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सायंकाळी सद्दाम आपल्या मित्राच्या स्कूटीवरून मेहबुब आलम याला जाब विचारण्यासाठी सिडको उद्यानाजवळील त्याच्या नारळपाणीच्या ठेल्यावर गेला होता.
यावेळी मेहबुबने सद्दामला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात मेहबूब आलम याने आपल्याजवळच्या चाकूने सद्दामच्या छातीवर व पोटावर गंभीर वार करून पलायन केले. या हल्ल्यात सद्दाम शेख गंभीर जखमी झाल्याने प्रथम त्याला अष्टविनायक रुग्णालयात व नंतर एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे सद्दामचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी आरोपी मेहबूब आलम याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. आलम मूळगावी पटणा येथे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर खांदेश्वर पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढत, तो पटणा येथे पोहोचण्यापूर्वी त्याला ओरा रेल्वे स्थानकातून अटक केली. न्यायालयाने त्याला ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Thank you for publishing this awesome article.