वेलिंग्टन: न्यूझीलंडच्या सागरी हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, समुद्रावर तरंगत असलेला ३.२ टनांचा कोकेन साठा जप्त करण्यात आला आहे. त्याचं मूल्य ३०० मिलियन डॉलर (भारतीय रुपयांत २४ अब्जांहून अधिक) इतकी आहे.

न्यूझीलंड पोलीस, न्यूझीलंड संरक्षण दल आणि कस्टम विभागानं संयुक्त कारवाई करत समुद्रात तरंगत असलेला कोकेनचा साठा जप्त केला. या प्रकरणी अद्याप तरी कोणालाही अटक झालेली नाही. पोलीस आयुक्त अँडी कोस्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात सापडलेला ३.२ टनांचा कोकेन साठा न्यूझीलंडमधील बाजारात तब्बल ३० वर्षे पुरला असता.
अशी औलाद नसलेली बरी! वडिलांवर अंत्यविधी करण्यासाठी मुलाची संतापजनक अट; लेकीनं दिला मुखाग्नी
पॅसिफिक समुद्रातील दुर्गम भागात तब्बल ३.२ कोटी टन कोकेन आढळून आलं. हा साठा समुद्रावर तरंगत होता. आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करांच्या सिंडिकेटनं हा साठा तिथे सोडला होता. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. न्यूझीलंडच्या पोलीस आणि संरक्षण दलांनी जप्त केलेला हा सर्वात मोठा ड्रग साठा आहे. त्यामुळे ही कारवाई ऐतिहासिक ठरली आहे. या कारवाईमुळे दक्षिण अमेरिकेत ड्रग्ज उत्पादकांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे.
तास उलटून गेला, एकजण माडावर हालचाल न करता बसलाय; पादचाऱ्याचा पोलिसांना फोन अन् मग…
गेल्या आठवड्यात समुद्रात गस्तीसाठी गेलेल्या नौदलाच्या बोटीवरील सैनिकांनी पाण्यात साठा तरंगताना पाहिला. हा साठा बहुधा ऑस्ट्रेलियाला नेला जात असावा. ऑस्ट्रेलियातील बाजाराला हा साठा वर्षभर सहज पुरला असता, असं पोलीस आयुक्त अँडी कोस्टर म्हणाले. पोलीस, कस्टम आणि सुरक्षा दलांनी गेल्या डिसेंबरमध्ये ऑपरेशन हायड्रोजला सुरुवात केली. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील यंत्रणांची मदत घेण्यात आली.

ऑपरेशन हायड्रोज अंतर्गत समुद्रातून होणाऱ्या संशयास्पद वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येतं. समुद्रात सापडलेल्या कोकेन साठ्याचा तपास केला जात आहे. त्यासाठी आंततराष्ट्रीय संस्थांची मदत घेतली जाईल, असं पोलीस आयुक्त अँडी कोस्टर यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here