मुंबई : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रेक्षकांची लाडकी ‘वनी’ अर्थात प्रख्यात अभिनेत्री वनिता खरात नुकतीच विवाहबंधनात अडकली. वनिताच्या विवाह सोहळ्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी अक्षरशः कल्ला केला. वनिताच्या लग्नात सर्वांचा तुफान डान्स असो किंवा धमाल फोटोग्राफी, सोशल मीडियावर सध्या याचीच धूम आहे.

पुण्याची विनम्र अभिनेत्री अशा शब्दात प्राजक्ता माळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात जिची ओळख करुन देते, त्या प्रियदर्शिनी इंदलकरने इन्स्टाग्रामवर दहा फोटो शेअर केले आहेत. shini_da_priya या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन शेअर केलेल्या फोटोंवर प्रियाच्या चाहत्यांनी कमेंट्सची बरसात केली आहे.

‘बरिचशी धावपळ, भरपूर रडारड, खूप दंगा आणि आभाळभर आनंद! थोडक्यात वनीचं लग्न!’ असे कॅप्शन प्रियाने या फोटोंना दिले आहे. या फोटोंत प्रिया मरुन रंगाच्या साडीत दिसतेय. नाकात नथ, हातावर मेहंदी असं तिचं रुपडं आकर्षून घेत आहे.

त्यापैकी आठवा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘दादरचा अमोल पालेकर’ अशी ओळख असलेला अभिनेता ओंकार राऊतसोबत प्रियदर्शिनीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियाच्या शेजारी ब्लॅक ब्लेझर आणि ग्लेअर्स असा कूल लूक असलेल्या ओंकारच्या छातीवर हात ठेवून ती उभी आहे. या फोटोवरुन अनेक चाहत्यांनी प्रियदर्शिनीला चिडवलं आहे.

सर्वसामान्य चाहत्यांसोबतच काही सेलिब्रिटींनीही प्रियाच्या फोटोवर खास कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता आस्ताद काळे यानेही या फोटोवर कमेंट केली आहे. ‘ज्या पद्धतीने ओमकार तुझ्याकडे पाहत आहे, एकत्र आनंदी आणि कणखर राहा मित्रांनो’ (The way Omkar is looking at you!!!�� Stay happy and strong together guys������������) अशी कमेंट आस्तादने केली आहे. या कमेंटला २५ हून अधिक लाईक्स आहेत.

Priyadarshini Indalkar Onkar Raut Aastad Kale

आस्तादच्या कमेंटला प्रियदर्शिनीने रिप्लाय दिला आहे. ‘हाहाहाहा! अरे काय तुम्ही पण’ अशा आशयाचा रिप्लाय तिने दिलाय. त्यावर आस्तादनेही ‘अर्रे!!!!! मनापासून आशीर्वाद देतोय’ असं उत्तर दिलंय. त्यामुळे चाहत्यांनीही प्रियाची फिरकी घेण्यास सुरुवात केलेय.


हेही वाचा : मुंबई-ठाणे पाण्याखालून प्रवास, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा महाराष्ट्रात, मुहूर्त ठरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here