म. टा. प्रतिनिधी, : मुलीला छेडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांवर तलवारीने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दोघा भावांना सोमवारी रात्री अटक केली. त्यांना ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी मंगळवारी दिले.

प्रकाश मुरलीधर अवचरमल (२८) व राहुल मुरलीधर अवचरमल (२२, रा. दोघे रा. सावित्री बाई फुलेनगर, वडगाव-कोल्हाटी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात पीडितेच्या वडीलांनी तक्रार दिली. पीडिता ही रस्त्याने जात-येत असताना आरोपी राहुल अवचरमल हा विनाकारण तिच्याकडे पाहून दोन महिन्यांपासून तिला त्रास देत होता. ३ जुलै रोजी दुपारी पीडिता ही घरी असताना आरोपी राहुलने तिला डोळ्याने खुणावून त्रास दिला. रात्री आठच्या सुमारास पीडितेचे वडील घरी आले असता तिने राहुल त्रास देत असल्याची बाब सांगितली. रात्री साडेनऊ वाजता पीडितेचे वडील आरोपीला समाजविण्यासाठी आरोपीच्या घरी गेले असता आरोपी प्रकाश व राहुल या दोघांनी शिवीगाळ व मारहाण केली. राहुलने तलवारसारख्या हत्याराने वार करून पीडितेच्या वडिलांना गंभीर जखमी केले. तर आवाज ऐकून आलेल्या पीडितेसह तिची बहीण व आईला देखील आरोपी मुरलीधर व विमल बाई अवचरमल यांनी शिवीगाळ केली. या प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपी मुरलीधर व विमल बाई यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला. तर पोलिसांनी आरोपी प्रकाश व राहुल या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले.

आरोपींना कोणी केली मदत?

सुनावणी वेळी, आरोपीने गुन्ह्यात वापरलेले तलवारीसारखे हत्यार कोठून आणले? याचा तपास करून ते जप्त करणे आहे. गुन्ह्यात आरोपींना कोणी मदत केली का? याबाबत देखील तपास करणे बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here