लखनऊ: उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात आई वडिलांनी त्यांच्याच २१ वर्षीय मुलीची हत्या केली. मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय त्यांना होता. मुलीची हत्या करताना दोन नातेवाईकांनी त्यांना साथ दिली. मुलीच्या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्यावर ऍसिड टाकण्यात आलं. त्यानंतर मुलीचा मृतदेह फेकून देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

तेन शाह आलमबाद गावात वास्तव्यास असलेल्या नरेश यांनी ३ फेब्रुवारीला लेक बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. मुलीचा मृतदेह गावाबाहेरच्या कालव्यात सापडला. नरेश आणि त्याची पत्नी शोभादेवी यांनी ३ फेब्रुवारी त्यांच्या राहत्या घरात मुलीची गळा दाबून हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. मुलीच्या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्यांनी बॅटरीमधील ऍसिड तिच्या शरीरावर ओतलं. तिचा मृतदेह लपवण्यासाठी नरेशचे भाऊ गुलाब आणि रमेश यांनी मदत केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी दिली.
अशी औलाद नसलेली बरी! वडिलांवर अंत्यविधी करण्यासाठी मुलाची संतापजनक अट; लेकीनं दिला मुखाग्नी
मुलगी मोबाईलवरून अनेक मुलांशी बोलायची. तिच्या बॅगमध्ये आम्हाला काही प्रेग्नन्सी टेस्ट किट्सदेखील सापडला. मुलीचे एखाद्या मुलाशी प्रेमसंबंध असावेत असा संशय आम्हाला त्यामुळे आला. यामुळे आम्ही फार संतापलो होतो. त्याच रागाच्या भरात लेकीला संपवल्याची कबुली नरेशनं पोलिसांकडे दिली. मुलीचा मृतदेह लपवण्यात नरेशच्या भावांनी त्याला मदत केली. त्या दोघांनादेखील या प्रकरणात अटक करण्यात आल्याचं श्रीवास्तव यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here