यासंदर्भात पद्मनाभन म्हणाले की, सध्या सणासुदीचे दिवस असूनही करोनामुळे दागिन्यांची विक्री जवळजवळ शून्यावर आली आहे. सराफांकडे असलेले दागिने विकल्याखेरीज नवे हाॅलमार्कचे दागिने विक्रीसाठी ठेवणे प्रत्येक सराफाला शक्य होणार नाही. त्यामुळे कौन्सिलने अन्य सराफ संघटनांना सोबत घेऊन केंद्र सरकारला निवेदन देण्याचे ठरवले आहे.
यावर्षी सप्टेंबर महिन्यात एकूण दागिन्यांच्या साठ्यापैकी ७० ते ८० टक्के साठ्याची जागा हॉलमार्कचे दागिने घेतील, अशी आशाही पद्मनाभन यांनी व्यक्त केली आहे. मात्र सध्याचा विक्रीचा वेग पाहता सराफांना आधीचा साठा काढून टाकण्यास वर्षभराहून अधिक कालावधी लागण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी १ जून २०२१ पर्यंत हॉलमार्किंगला मुदतवाढ देण्याचा निर्णय सराफांशी चर्चा करूनच घेण्यात आल्याचे सांगितले आहे. यापूर्वी यासाठी अंतिम मुदत १५ जानेवारी २०२१ ही होती.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पीआर यांच्या मते, सरकारने सध्या दिलेली १ जून २०२१ पर्यंतची मुदत पुरेशी असली तरी, करोनाचे सातत्याने वाढते संकट पाहता, ही मुदत वाढवणे श्रेयस्कर ठरेल.
हॉलमार्किंगची स्थिती
– १ जून २०२१ पासून सराफांना केवळ १४, १८ व २२ कॅरेट सोन्याचे दागिनेच विकता येणार.
– आतापर्यंत ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डकडे फक्त २८,८४९ सराफांनीच हॉलमार्किंगसाठी केली आहे नोंदणी.
– सध्या बाजारात विकल्या जात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी केवळ ४० टक्के दागिनेच हॉलमार्कसह विकले जात आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
A big thank you for your article.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.