भोपाळ: मध्य प्रदेशच्या अशोकनगरात विकास यात्रेदरम्यान मंत्री बृजेश सिंह यांच्या अंगावर कोणीतरी स्वागत करतेवेळी खाजेची पावडर टाकली. त्यामुळे मंत्र्यांच्या अंगाला खाज सुटली. मंत्र्यांनी गावातील एका घरात जाऊन आंघोळ करून कपडे बदलले. तेव्हा कुठे खाज थांबली आणि मंत्र्यांना हायसं वाटलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेश सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले मुंगावलीचे आमदार बृजेश सिंह यादव भाजप विकास यात्रेच्या अंतर्गत विधानसभा क्षेत्रातील गावागावांमध्ये जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्याकडून लोकांना सरकारी योजनांची माहिती दिली जात आहे. अनेक प्रकल्पांचं भूमिपूजनदेखील सुरू आहे.
लेक अनेक मुलांशी बोलायची, बॅगेत ‘ती’ वस्तू सापडली; आई-वडिलांचा पारा चढला, मुलीला संपवलं
विधानसभा मतदारसंघातील देवरछी गावात मंत्री यादव यांची विकास यात्रा पोहोचली. त्यावेळी त्यांच्यावर कोणीतरी खाजेची पावडर टाकली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात मंत्री गावात रात्री आंघोळ करताना दिसत आहेत. कोणीतरी खाजेची पावडर टाकल्याचं मंत्री म्हणत आहेत. खाजेच्या पावडरमुळे मंत्री त्रासले. त्यांच्या पूर्ण शरीराला खाज सुटली.

अखेर मंत्री बृजेश सिंह यांनी गावात आंघोळ करून कपडे बदलले. कोणीतरी खोडी काढण्यासाठी मंत्र्यांच्या स्वागतासाठी आणलेल्या फुलांमध्ये खाजेची पावडर टाकली होती. त्यामुळे मंत्र्यांना खाज सुटली. यामुळे मंत्री हैराण झाले. अखेर त्यांनी गावातच आंघोळ केली. तेव्हा कुठे खाज थांबली.
अशी औलाद नसलेली बरी! वडिलांवर अंत्यविधी करण्यासाठी मुलाची संतापजनक अट; लेकीनं दिला मुखाग्नी
बृजेश सिंह यादव २०१८ पासून विधानसभेत मुंगावली मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. २०१८ मध्ये तत्कालीन आमदार महेंद्र सिंह कालुखेडा यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. त्यात यादव निवडून आले. डिसेंबर २०१८ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक झाली. त्यात यादव यांनी विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा विधानसभा गाठली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here