ढाका: घराबाहेर मोठा जमाव आहे. सगळे संतप्त आहेत. ते माझी हत्या करतील, अशा आशयाचा फोन बांगलादेश पोलिसांच्या इमर्जन्सी फोन नंबरवर आला. कृपया मला वाचवा, असं म्हणत समोरच्या व्यक्तीनं पोलिसांकडे गयावया केली. त्यानंतर ढाका पोलीस त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचले. घराला स्थानिकांनी गराडा घातला होता. त्यातील बहुतांश जण संतापले होते. अखेर पोलिसांनी घरात स्वत:ला कोंडून घेतलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं आणि त्याला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेलं.

‘मी एका महिलेची हत्या केली आहे. आता स्थानिक माझ्या घराबाहेर जमले आहेत. ते मला संपवतील. तुम्ही कृपया मला मदत करा,’ असा फोन पोलिसांना आला. ढाक्यातील उत्तरखान परिसरात वास्तव्यास असलेल्या ४७ वर्षीय हझरत अलीनं हा फोन केला होता. पोलिसांनी त्याचं घर गाठलं आणि त्याची सुखरुप सुटका केली. ३७ वर्षीय महिलेच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी हझरतला अटक केली.
लेक अनेक मुलांशी बोलायची, बॅगेत ‘ती’ वस्तू सापडली; आई-वडिलांचा पारा चढला, मुलीला संपवलं
हझरत अलीचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. तिला दोन मुलं आहेत. महिलेनं हझरतचं घर गाठलं आणि लग्न करण्याची मागणी केली. ती लग्नासाठी दबाव टाकू लागली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हझरतनं तिची हत्या केली. ‘हझरतनं वरवंटा डोक्यात घालून महिलेला संपवलं. त्याआधी ती मदतीसाठी आक्रोश करत होती. तिचा आवाज ऐकून आसपासचे लोक घराबाहेर गोळा झाले. मात्र हझरतनं महिलेची हत्या केली,’ अशी माहिती उत्तरखान पोलीस ठाण्याचे प्रभारी अब्दुल माजिद यांनी दिली.
अशी औलाद नसलेली बरी! वडिलांवर अंत्यविधी करण्यासाठी मुलाची संतापजनक अट; लेकीनं दिला मुखाग्नी
महिलेचा आवाज ऐकून शेजारपाजरचे लोक हझरतच्या घराबाहेर जमले. ते दार ठोठावू लागले. हझरतनं स्वत:चा बचाव करण्यासाठी पोलिसांना फोन केला. स्वत:ला घरात कोंडून घेत त्यानं पोलिसांच्या इमर्जन्सी नंबरशी संपर्क साधला. ‘मी महिलेची हत्या केली आहे. तुम्ही लवकर या. मला ताब्यात घ्या. अन्यथा लोक मला मारुन टाकतील,’ असं त्यानं फोनवर पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here