ढिगारा उपसून नातेवाईकांची शोधाशोध करणाऱ्या ४० वर्षांच्या इब्राहिम यांचे कपडे धुळीनं खराब झाले आहेत. डोळ्यांतले अश्रू थांबत नाहीएत. या परिस्थितीत ढिगाऱ्यात शोधाशोध सुरूच आहे. ‘माझं संपूर्ण कुटुंब भूकंपात गेलं. हा पूर्णत: नरसंहार आहे. सुदैवानं भूकंपावेळी मी, माझी पत्नी आणि मुलं शहरातील आमच्या घरातून वेळीच बाहेर पडलो. त्यामुळे आम्ही वाचलो,’ असं इब्राहिम यांनी सांगितलं.
जेव्हा जेव्हा माझ्या हाती एखाद्या नातेवाईकाचा मृतदेह लागतो, त्यावेळी मनात असंख्य आठवणी येतात. आम्ही एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण आठवतात. मी आता माझ्या नातेवाईकांना आता कधीच पाहू शकणार नाही. ढिगाऱ्याखाली माझ्या नातेवाईकांपैकी कोणी जिवंत असेल याची शक्यता कमीच आहे. पण मन मानत नाही. गेले २ दिवस मी झोपलेलो नाही. नातेवाईकांचा शोध सुरुच आहे. माझ्यावर कोसळलेलं संकट मी कोणत्या शब्दांत सांगू? माझ्याकडे शब्द नाहीत, अशी व्यथा इब्राहिम यांनी मांडली.
Home Maharashtra syria earthquake, हृदयद्रावक! डोळे पुसतोय, आप्तांना शोधतोय; भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकले ३० नातेवाईक...
syria earthquake, हृदयद्रावक! डोळे पुसतोय, आप्तांना शोधतोय; भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकले ३० नातेवाईक – syrian man digs for 30 relatives buried by earthquake
बेसनाया: तुर्किये आणि सीरियामध्ये सोमवारी भूकंप झाला. भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढत चालला आहे. या नैसर्गिक आपत्तीनं अनेकांचा जीव घेतला. कित्येकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. काही कुटुंबांच्या कुटुंब संपली. तर काही जण सुदैवानं वाचले. मात्र त्यांच्या कुटुंबातील कित्येक जण दगावले. काहींचे मृतदेह सापडले. तर काहींचे मृतदेह अद्याप सापडायचे. वेळ सरत चालली आहे, तशी माणसं वाचण्याची शक्यता मावळत चालली आहे.