लखनऊ : कॉलेजमध्ये शिकणारी १३ वर्षीय विद्यार्थीनी प्रिया राठौर हिच्या आत्महत्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तिने आत्महत्या करण्याआधी लिहलेली सुसाईड नोट आता पोलिसांच्या हाती लागली आहे. ही नोट लिहताना प्रिया हिला इतका राग आला होता की तिने नोटच्या शेवटी Thank You असं लिहित पेनाची निब तोडली. लखनऊच्या एसआर ग्लोबलमध्ये शिकणाऱ्या या तरुणीच्या आत्महत्येचं मन सुन्न करणारं कारण समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया इयत्ता आठवीमध्ये शिकते. तिने आत्महत्या करण्याआधी लिहलेली सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली असून यामध्ये प्रियाने आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं आहे. यात तिने लिहलं की, ‘माझ्या रागासमोर या जगाचं काहीही चालणार नाही. मी आतापर्यंत रागावर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मला शक्य झालं नाही. माझा राग आणि हट्टीपणा कोणालाही कळू शकणार नाही’

एका महिलेचा २ पुरूषांसोबत सुरू होता भलताच व्यवसाय; रंगेहात पकडताच पोलिसही चक्रावले
तिने पुढे लिहलं की, ‘मी रागाच्या भरात हॉस्टेलमध्ये मग तोडला, आई आणि मावशीसोबत भांडले, गौरीचे डोके फोडले आणि वर्गातल्या मुलीला मारहाण केली आणि आजही गणवेश फेकून दिला, मी आजही रागात होती. मी राग कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता नाही, आता ते शक्य नाही’ असं लिहून तिने शेवटी Thank you लिहिलं आणि पेनाची निब तोडली.

प्रियाने तिच्या शेवटच्या या चिठ्ठीमध्ये तिच्या बऱ्याच जुन्या घटनांचा उल्लेख केला आहे. तिने लिहिले की, ‘मी पाचवीच्या वर्गातील आठवणी अद्याप विसरले नाही, विशेषत: माझ्या रागापुढे दुसरे काही नाही.’ प्रियाने ही चिठ्ठी कोणासाठी लिहिली होती, तिचा कोणाबद्दल इतका द्वेष होता हे शोधण्याचं पोलिस आता प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, प्रियाला कसला तरी मोठा धक्का बसला असावा, तिच्या कोणी जवळच्या व्यक्तीने असं काही केलं असावं, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. २० जानेवारी रोजी वसतिगृहात प्रियाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर तिच्या तपासात अनेक खुलासे समोर आले आहेत.

गर्लफ्रेंडचे तुकडे करण्याआधी खेळला मास्टर गेम; वेबसीरिज पाहिली, इंटरनेटवरून असं सर्च केलं की पोलिसही हैराण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here