Agriculture News : एका बाजूला शेतकऱ्यांचा (Farmers) उत्पादन खर्च वाढला असताना दुसरीकडं शेतमालाला चांगला दर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कोबीला (Cabbage) चांगला बाजारभाव (Market Price) मिळत नसल्यामुळं पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर  आली आहे. इंदापूर (Indapur) तालुक्यातील तक्रारवाडी येथील सुनील काळंगे (Sunil Kalange) या शेतकऱ्याने आपल्या 10 गुंठे कोबी पिकावर रोटावेटर फिरवला आहे. यामुळं त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Cabbage Price : कोबीच्या एका फुलाला किरकोळ बाजारात तीन ते पाच रुपयांचा दर  

शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. पिकावर केलेला खर्चही निघणे कठीण झालं आहे. सध्या कोबीच्या एका फुलाला किरकोळ बाजारात अगदी तीन ते पाच रुपये असा बाजारभाव मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा मजुरी खर्च देखील निघत नाही, अशी अवस्था झाली आहे.

Production Cost : 10 गुंठे कोबीसाठी एकूण 25 हजार रुपयांचा खर्च

1 नोव्हेंबर 2022 ला 10 गुंठे क्षेत्रावर कोबी पिकाची लागवड केली होती. सेंट या कोबीची 10 हजार रोपांची लागवड झाली होती. रोपे व्यवस्थित आली होती. मात्र, सध्या कोबीला योग्य बाजारभाव नसल्यामुळं पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली असल्याचे शेतकरी सुनील काळंगे यांनी सांगितले. 10 हजार रोपांसाठी 10 हजार रुपयांचा खर्च आला. तसेच खुरपणीसाठी चार हजार तर खतांसाठी पाच हजार रुपये तसेच इतर औषधांसाठी पाच हजार रुपयांचा खर्च आला आहे. 10 गुंठे कोबीसाठी एकूण 25 हजार रुपयांचा खर्च आला असून, हातात काही उत्पन्न आलं नसल्याचे काळंगे यांनी सांगितले. केवळ बाजारभाव नसल्यामुळं कोबी काढून टाकण्याची वेळ आल्याचे सुनील काळंगे यांनी सांगितले.  

Climate Change : हवामान बदलाचाही पिकांना मोठा फटका 

शेतकऱ्यांना सातत्यानं विवध संकटाचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सध्या बाजारात शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. अशातच शेती पिकांना हवामान बदलाचा देखील मोठा फटका बसत आहे. हवामान बदलामुळं पिकावर विविध रोगांचा किडीचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळं पिकावर फवारणी करावी लागत आहेय फवारणीसाठी करावी लागणाऱ्या औषधांचा मोठा खर्च आहे. पिकातून हा उत्पादन खर्च देखील निघणं कठीण झालं आहे. त्यामुळं शेतकरी अडचणीत सापडलेआहेत.  

महत्त्वाच्या बातम्या:

Cotton News: औरंगाबादेत कापसाचे दर दोन दिवसांत 300 रुपयांनी घसरले; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here