बांदा: उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये एका तरुणीनं हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे दुखावलेल्या तिच्या प्रियकरानं बुधवारी केन नदीवरील रेल्वे पुलावर असलेल्या सेल्फी पॉईंटवरून खाली उडी घेत आयुष्य संपवलं. मटौंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भूरागढ येथे ही घटना घडली.

नहर कोठी बांदा रोड येथील अतर्राचा रहिवासी असलेला मोहसीन खान (२०) केसीएनआयटी बांदातील आयटीआयचा विद्यार्थी होता. बुधवारी तो त्याच्या मित्रांसोबत केन नदीवरील रेल्वे पुलावर गेला होता. तिथे एक सेल्फी पॉईंट आहे. तिथे तीन मित्र सेल्फी काढत होते. त्याचवेळी मोहसीननं अचानक नदीत उडी मारली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह क्षेत्राधिकारी तिथे पोहोचले.
फेशियलचा बहाणा, नवरदेव पळाला; लहान भावानं वहिनीसोबत लग्न करताच मोठा भाऊ परतला अन् मग…
मोहसीननं उडी टाकताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. पोलिसांना याबद्दल समजताच मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. मात्र मोहसीनचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. मोहसीनचे वडील शमशेर खान सिंचन विभागात कार्यरत आहेत. मोहसीनला एक मोठा भाऊ आहे. तो कोटामध्ये राहून इंजिनीयरिंगचं शिक्षण घेत आहे. घटनेमुळे मोहसीनच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लेक अनेक मुलांशी बोलायची, बॅगेत ‘ती’ वस्तू सापडली; आई-वडिलांचा पारा चढला, मुलीला संपवलं
मोहसीनच्या प्रेयसीनं हाताची नस कापून घेतली होती. हा प्रकार मोहसीनला रेल्वे पुलावर सेल्फी काढताना समजला. त्याला एका मित्राचा फोन आला होता. प्रेयसीनं हाताची नस कापल्याचा जबर धक्का मोहसीनला बसला. त्यानं नदीत उडी घेतली. ‘एका तरुणानं नदीत उडी मारल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचं प्राथमिकृष्ट्या दिसत आहे. घटनेवेळी तरुणासोबत असलेल्या त्याच्या दोन मित्रांची चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून अधिकची माहिती मिळू शकेल,’ असं पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here