नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर कालच्या तुलनेत मौल्यवान धातूंच्या किमतीत घट दिसून येत आहे. सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात थोडा बदल दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारात सोने-चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असून गुरुवार, ९ फेब्रुवारी रोजी चांदीच्या दरात घसरण झालेली दिसतेय. मात्र, वायदे बाजारात सोने आणि चांदी दोन्ही लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत.

सोने आणि चांदीचा भाव
आज देखील सोन्याच्या दरात घट झाली असली तरीही लागसराईच्या हंगामात सर्वसामान्यांना सोने खरेदीसाठी प्रति १० ग्रॅम ५७ हजारांची किंमती मोजावी लागणार आहे. दिवसाच्या सुरुवातीला सोने ५७ हजार २२० रुपयांवर उघडले. यानंतर, त्याच्या किंमतीत घट झाली आणि सकाळी १०:३० पर्यंत मौल्यवान धातू ५७ हजार १७० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचले. बुधवारच्या सत्रात सोने ५७ हजार २१५ रुपयांवर बंद झाले होते.

Petrol Price Today: रशियाकडून स्वस्त तेल खरेदीचा ‘UAE’ प्लॅन, भारतीय कंपन्यांनी शोधला अनोखा मार्ग
दुसरीकडे चांदीबद्दल बोलायचे तर एमसीएक्सवर किमतीत किंचित नरमाई दिसून येत आहे. आज चांदीने ६७ हजार ६१९ रुपये प्रति किलोच्या पातळीवरून व्यवहार सुरु केला. आणि सकाळी १०:३० वाजेपर्यंत चांदी ६७ हजार १७० रुपये प्रति किलोवर घसरली. अशा स्थितीत आज सोन्या-चांदीच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही आहे.

गृहकर्ज EMI वाढण्याची चिंता आहे? व्याजाचे ओझं कमी करण्यासाठी या युक्त्या वापरुन पाहा
दरम्यान, बुधवार ८ फेब्रुवारी रोजी बाजार बंद झाला तेव्हा सोने ५७,२१५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव ६७,६३३ रुपये प्रति किलो होता. भारतात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य अशा अनेक घटकांवर सोने आणि चांदीचे दर अवलंबून असतात. तसेच जागतिक मागणी देखील मौल्यवान धातूंचे दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

Leave Encashment: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; लीव्ह एनकॅशमेंट नियम बदलला, असा होईल फायदा
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर
जागतिक पातळीवर सोने आणि चांदी आज हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. ५ एप्रिल, रोजी परिपक्व होणारे सोन्याचे वायदे १५ रुपये किंवा ०.०३ टक्क्यांनी किंचित वाढीसह एमसीएक्सवर रु. ५७ हजार २६९ प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते. तर ३ मार्च रोजी परिपक्व होणारी चांदीच्या फ्युचर्समध्ये ७१ रुपये किंवा ०.१० टक्क्यांनी घसरण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here