या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत नारायण वाघ हे पत्नी, दोन मुले व कुटुंबातील अन्य सदस्यांसह वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव शिवारातील गोपालेश्वर मंदिर परिसरातील शेतवस्तीवर राहतात. नारायण वाघ यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. त्यामुळे त्यांचे नेहमी मुलांसोबत, कुटुंबियांसोबत वाद व्हायचे. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ते दारू पिऊन घरी आले. त्यावेळी त्यांनी घरात शिवीगाळ आरडाओरड सुरू केली.
त्यामुळे दोन्ही मुलांचा आण् वडिलांचा वादा झाल. हा वाद सुरू असतानाच परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलीस पाटलांना दिली. जेव्हा पोलीस पाटील घटनास्थळी आले तेव्हा त्यांना नारायण वाघ हे मृतावस्थेत दिसले. वडील नारायण वाघ हे नेहमीच दारू पिऊन त्रास देत होते. एवढेच नव्हे तर घरातील सर्वच सदस्यांना शिवीगाळ करून मारहाण करायचे. त्यामुळे रागाच्या भरात त्यांच्या डोक्यात दगड व लोखंडी गजाने मारहाण त्यांची हत्या केली आणि नंतर मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली शुभम आणि विकास वाघ यांनी त्यांना दिली.
घटनेची माहिती पोलीस पाटलांनी वैजापूर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी ७ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा घटनास्थळी जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी धोंदलगाव येथील पोलीस पाटलांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही मुलांविरुध्द वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.