नागपूर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने दमदार संघ उतरवला आहे. पहिला कसोटी सामना आजपासून नागपूर येथे खेळवला जात येऊ. या सामन्यातून भारताचा दमदार गोलंदाज दुखापतीतून सावरत त्याने संघात पुन्हा पुनरागमन केले आहे. २०२२ मधील आशिया चषकापासून संघाबाहेर असलेला रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसत आहे. त्याने या सामन्यात आपला फॉर्म चांगलाच दाखवून दिला आहे.

जडेजाने या कसोटी मालिकेच्या संघाचा भाग होता आणि आजच्या पहिल्याच सामन्यात त्याला ११ सदस्यीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत त्याने एकाच षटकात सलग दोन विकेट्स मिळवल्या. तर नंतर महत्त्वाची विकेट म्हणजेच स्टीव्ह स्मिथला क्लीन बोल्ड करत त्यांचा अर्धा संघ तंबूत धाडला. सामन्यात सुरुवातीला गोलंदाजी करताना जडेजा काही मेडेन षटकेही टाकली. पण त्याने त्याच्या स्पेलमधील ११ व्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग दोन विकेट्स मिळवल्या.

Ind vs Aus 1st Test Live Score: ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत, भारताच्या गोलंदाजांनी उडवली दाणादाण
पहिली विकेट

जडेजा त्याच्या दमदार गोलंदाजीवर ४९ धावांवर खेळत असलेल्या लाबुशेनला पॅव्हेलियनमध्ये धाडले. जडेजाने टाकलेल्या चेंडूवर लाबुशेन पुढे येऊन शॉट मारू पाहत होता पण तो चुकला आणि चेंडू थेट श्रीकर भरतच्या हातात गेला. भरतने आपली चपळाई दाखवत क्षणाचाही विलंब न करता त्याला स्टंपिंग करत बाद केले. केएस भरतची देखील त्याच्या पदार्पणातील ही पहिली विकेट होती. या दोघांनी मिळून संघाला मोठे यश मिळवून दिले.

IND vs AUS: रोहितची चतुराई! सिराजच्या चेंडूवर एका सेकंदात मिळाली भारताला पहिली विकेट, पाहा VIDEO
दुसरी विकेट

जडेजाने लगेचच पुढच्या चेंडूवर नुकताच फलंदाजीला आलेल्या रेनेशॉला मैदानात एक चेंडू ही खेळण्याची संधी दिली नाही. लगेचच पुढच्या सहाव्या चेंडूवर त्याला एलबीडब्ल्यू बाद करत पॅव्हेलियनमध्ये धाडले. जडेजाने त्याच्या गोलंदाजीमुळे मैदानात चांगलीच जम बसवलेली स्मिथ आणि लाबुशेनची भागीदारी तोडली आणि ऑस्ट्रेलियाचं टेन्शन पुन्हा वाढवलं.


स्मिथ क्लीन बोल्ड

संघाचे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात असलेल्या स्टीव्ह स्मिथवर संघाची जबाबदारी होती. त्याने अक्षर पटेलच्या चेंडूंवर चांगलीच दमदार फटकेबाजी केली. पुढच्या षटकासाठी चेंडू जडेजाकडे सोपवला. त्याने या षटकात स्मिथला एकही धाव घेऊ दिली नाही आणि अखेरीस षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने स्मिथला क्लीन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाची झोप उडवली. स्मिथने मैदानावर राहत १०७ चेंडूत ३७ धावा केल्या. तर जडेजाने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी आपल्या नावे तीन विकेट्स केल्या.


जडेजा इज बॅक!

आशिया चषक २०२२ मध्ये झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे जडेजा संघातून बाहेर होता. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि मग त्याने एनसीएमध्ये ट्रेनिंग घेत या दुखापतीतून सावरत मेहनत घेतली आणि संघात स्थान मिळवले. संघात पुन्हा स्थान मिळण्यापूर्वी त्याने रणजी ट्रॉफीमधील सामन्यात आपला फिटनेस सिद्ध केला. त्याने त्या सामन्यात ७ विकेट्स मिळवत आपला फॉर्म दाखवून दिला आणि भारताच्या कसोटी संघात आपले स्थान पक्के केले. जडेजाला पुन्हा जुन्या फॉर्मात आलेला पाहून संघाचे टेन्शन नक्कीच कमी झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here