हिंगोली : काँग्रेसच्या विधानपरिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांना मारहाण प्रकरणात आरोपी महेंद्र डोंगरदिवे याला अटक करण्यात आली आहे. मात्र, अटक केल्यानंतर आरोपीच्या चेहऱ्यावर पश्‍चातापाचा लवलेशही दिसत नव्हता. उलट “साहेब मला बकऱ्या चारायला जायचंय. जाऊ द्या ना. संध्याकाळी परत येतो” असं तो आखाडा बाळापूर पोलिसांना म्हणत होता. त्यामुळे आपण काय कृत्य केले, याची जाणीवही आरोपीला नसल्याचे दिसून येत होते.

आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कसबेधावंडा येथे काल रात्री हल्ला झाला होता. डॉ. प्रज्ञा सातव गावकऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना महेंद्र याने त्यांना मागे ओढून पाठीत आणि गालावर चापट मारली. या प्रकारानंतर एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या तक्रारीवरून गुरुवारी पहाटे आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

आरोपी म्हणतो- मी मारलेच नाही

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधानापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या पथकाने आरोपी महेंद्र याला तातडीने अटक केली. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी सुरु केली असता त्याच्या चेहऱ्यावर पश्‍चातापाचा लवलेशही दिसून आला नाही, त्याने नेमके काय केले हे त्याला सांगता येईना, मी काहीच केले नाही, असे तो वारंवार पोलिसांना सांगू लागला आहे.

साहेब मला बकऱ्या चारायला जायचे आहे, मला सोडा. मी बकऱ्या चारून सायंकाळी परत येतो, अशी याचना पोलिसांकडे करू लागला आहे. मी काहीही केले नाही, असेच आरोपी वारंवार पोलिसांना सांगू लागला आहे. आता पोलिसांनी त्याला घेऊन घटनास्थळी भेट देण्याची तयारी सुरु केली आहे.

निम्मा पगारच लाच मागितला, नगरमध्ये वैद्यकीय अधिकारी महिलेला अटक
माझ्यावरील हल्ल्यामागे मोठी ताकद – प्रज्ञा सातव

माझ्यावरील हल्ल्यामागे मोठी ताकद असू शकते, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. हल्लेखोराशी माझे कोणतेही वैमनस्य नव्हते. त्याला मी ओळखतही नाही. त्याने माझ्यावर हल्ला करण्याचे कोणतेही कारण नव्हते. त्यामुळे या हल्ल्यामागे एक मोठी शक्ती असू शकते. हल्लेखोराच्या पाठीमागे कोण आहे…? हे समोर येईपर्यंत आमचे समाधान होऊ शकत नाही, असे प्रज्ञा सातव म्हणाल्या.

लेकासोबत खुशीत निघालेले, इतक्यात बाईकशी जोरदार धडक, बापाने मुलासमोरच तडफडून जीव सोडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here