महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
ही योजना विशेषतः महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही दोन वर्षासाठी किमान दोन लाखांची गुंतवणूक करू शकता. बचत योजनेतील गुंतवणूकदारांना वार्षिक ७.५% नुसार परतावा मिळेल. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूक केल्यास तुम्हाला NSC, PPF, सुकन्या समृद्धी योजना इत्यादी सारख्या लहान बचत योजनांपेक्षा जास्त परतावा मिळेल. तसेच लहान बचत योजनांमध्ये आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत महत्त्वपूर्ण कर सूट मिळते. मात्र, या योजनेत कर आकारणी अद्याप समजलेली नाही. या योजनेवर अंशत: पैसे काढण्याची सुविधा देखील सरकारने देतेय. या योजनेअंतर्गत तुम्ही नवीन आर्थिक वर्ष म्हणजे १ एप्रिलपासून कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) की बँक मुदत ठेवी
भारतीय स्टेट बँक (एसबीआय), एचडीएफसी, अॅक्सिस बँक, ICICI आणि कोटक बँकेसह देशातील प्रमुख वित्तीय संस्था मुदत ठेवींवर ३%- ६.३५ टक्केनुसार व्याज देते. महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचा दोन वर्षाचा कालावधी आहे. एसबीआय दोन वर्षांच्या ठेवीवर ६.७५ टक्के, अॅक्सिस बँक एफडी ७.२६ टक्के, HDFC बँक एफडी ७%, ICICI बँक एफडी ७% आणि कोटक बँक ६.७५ टक्के व्याज देते. तर याउलट MSSC योजना आघाडीच्या बँक एफडीपेक्षा ०.५० ते १ टक्के जास्त व्याज देते.
कोणत्या योजनेत जास्त परतावा?
स्टेट बँक व्यतिरिक्त, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक त्यांच्या ग्राहकांना दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर ३ ते ७% पर्यंत व्याजदर देत आहेत. अशा परिस्थितीत, महिला सन्मान बचत खात्यात मिळणारा व्याजदर या बँक एफडीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे, जर तुम्ही बँकेत दोन लाख रुपयांपर्यंत एफडी करण्याचा विचार करत असाल, तर MSSC मध्ये गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय आहे. तसेच, बँक FD च्या तुलनेत, महिला बचत योजना दोन वर्षांच्या कालावधीसाठी ७.५ टक्के निश्चित केलेला उच्च-व्याज दर देते ज्याला सरकारचे समर्थन असल्यामुळे क्रेडिट जोखीम नाही.