वाचा-
नियमीत वेळेने हात धुतल्याने करोना संसर्ग टाळता येतो. याचा फायदा काही कंपन्यांना झाल्याचे दिसून येते. त्यात ही भारतीय लोकांनी () साबणाचा सर्वात जास्त वापर केल्याचे दिसत आहे. लोकांनी करोना पासून वाचण्यासाठी डेटॉलचा वापर सर्वाधिक केला. यामुळे डेटॉल भारतातील सर्वाधिक विकला जाणारा साबण झाला आहे. डेटॉल साबणाने प्रथमच विक्रीच्या बाबत पहिले स्थान मिळवले. याबाबत त्याने हिंदुस्तान युनिलिव्हरचे दोन प्रसिद्ध उत्पादने लाइफबॉय (Lifebuoy) आणि लक्स (Lux) या दोघांना मागे टाकले आहे.
वाचा-
साबणाच्या विक्रीचा विचार केल्यास जागतिक पातळीवर ६२ टक्क्यांची वाढ झाली आहे. डेटॉलच्या भारतीय बाजारपेठेतील शेअरमध्ये ४३० बेसिस पाइंटची वाढ झाली. २०१९ साली भारतीय सोप मार्केटमध्ये लाइफबॉयचा वाटा १३.१ टक्के होता. दुसऱ्या क्रमांकावर गोद्रेजचे बाजारातील वाटा १२.३ टक्के इतका होता. तर १०.४ टक्क्यांसह डेटॉल तिसऱ्या स्थानावर होते.
वाचा-
इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार २०१७ साली लाइफबॉयचा मार्केट शेअर १५.७ टक्के इतका होता. दोन वर्षात त्यात घट झाली आणि तो २०१९ साली १३.१ टक्क्यांवर आला. दुसऱ्या बाजूला डेटॉलच्या मार्केट शेअरमध्ये वाढ झाली. डेटॉल साबण युकेच्या हेल्थकेअर अॅण्ड कज्यूमर गुड्स मेकर Reckitt Benckiserचा ब्रॅड आहे.
वाचा-
दोन वर्षात डेटॉलच्या मार्केट शेअरमध्ये मोठी वाढ झाली. २०१७ साली भारतीय बाजारपेठेत त्याचा वाटा ९.७ टक्के इतका होता. तो २०१९ साली १०.४ टक्क्यांवर पोहोचला. मार्केट शेअरबाबत गोद्रेज दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१९मध्ये त्यांचे मार्केट शेअर १२.३ टक्के इतके होते.
वाचा-
भारतीय सोप बाजारपेठ जवळपास २२ हजार कोटी रुपयांची आहे. २०२० च्या पहिल्या तिमाहीत डेटॉलच्या विक्रीत तब्बल ५०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Thanks so much for the blog post.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Thank you for publishing this awesome article.