दरम्यान, आपले बिंग फुटले असे लक्षात आल्यानंतर संधी मिळताच प्रेयसीने तेथून पळ काढला, मात्र महिलेने तेथेच गोंधळ घालायला सुरू केले. त्यानंतर नियंत्रण कक्षाला फोन करून पोलिसांना पाचारण करण्यात आले. घडलेला सगळा प्रकार पाहिल्यानंतर हॉटेलचे कर्मचारीही घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी पती-पत्नीला पकडून पोलिस ठाण्यात आणले.
पतीसह पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या महिलेने पोलीस ठाण्यातही चांगलाच गोंधळ घातला. महिलेने पतीविरुद्ध लेखी तक्रार दिली. पत्नीच्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी पती आणि पत्नीच्या कुटुंबीयांनाही बोलावले. महिलेने सांगितले की, ती बऱ्याच दिवसांपासून आपल्या पतीची अशी कृत्ये पाहत होती. पत्नीला आपल्या पतीच्या बाहेरख्यालीपणाबाबत माहिती मिळाली होती. तेव्हापासून ती पतीवर लक्ष ठेवूनच होती. गेल्या काही दिवसांपासून नवऱ्याच्या मागे लागली होती.
आज पतीला रंगेहात पकडले
आज मात्र पत्नीला आपल्या पतीला रंगेहाथ पकडण्याची संधी मिळाली. आपला पती एका मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये व्हॅलेंटाइन विक साजरा करण्यासाठी गेला असल्याची पक्की खबर पत्नीला मिळाली होती. त्यानंतर तिने कशाचाही विचार न करता आज आपल्या पतीला रंगेहात पकडायचेच असे मनाशी पक्के करून तिने आपला मोर्चा हॉटेलकडे वळवला आणि पतीला रंगेहात पकडले.