billionaire woman announce to donate 24 crore, महिलेची मोठी घोषणा, २४ कोटी रुपये लोकांना वाटणार, लकी ड्रॉद्वारे करणार निवड… – billionaire woman announce to give 24 crore rupees to 41 lucky people in australia
कॅनबेरा: १५ दिवसांपूर्वी बंगळुरु येथील एका फ्लायओव्हरवरुन एक व्यक्ती पैशांचा वर्षाव केला होता. असंच आणखी एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. एका महिलेने तब्बल २४ कोटी रुपये लोकांमध्ये वाटणार असल्याची घोषणा केली आहे. तिने तिच्या वाढदिवसाला लोकांना भेट म्हणून हे पैसे देणार असल्याचं सांगितलं.
या श्रीमंत महिलेचं नाव जीना राइनहार्ट आहे. त्या ऑस्ट्रेलियाच्या रहिवासी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार ६९ वर्षीय राइनहार्ट यांच्याकडे ३४ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. त्या ऑस्ट्रेलियातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्याशिवाय त्या जगातील ४७ व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी २४ कोटी रुपये वाटणार असल्याची घोषणा करून सर्वांनाच चकित केले आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत सोशम मीडियावर चर्चा सुरु आहे. समलैंगिक म्हणून कर्मचाऱ्याची खिल्ली उडवली, मग त्याने जे केलं ते पाहून बॉसला घाम फुटला…
जीना यांनी ४१ लोकांमध्ये हे २४ कोटी रुपये वाटण्याची घोषणा केली आहे. या ४१ जणांची निवड लकी ड्रॉद्वारे केली जाणार आहे. हे ४१ जण त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना देणार आहेत. त्यांच्या कंपनीतील ४१ जणांची लकी ड्रॉद्वारे निवड केली जाणार आहे, त्यानंतर त्यांना हे पैसे दिले जाणार आहेत.
जीना या खाण, ऊर्जा आणि कृषी कंपनीच्या मालक आहेत. त्यांच्या कंपनीला चांगला नफा झाला. त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना पैसे देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ही घोषणा केल्यानंतर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण म्हणत आहेत की काश आम्ही पण त्या कंपनीत असतो. तर अनेकांच्या मते त्यांनी कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना हा बोनस द्यावा फक्त ४१ जणांना नाही. तसेच, त्यांच्या या निर्णयाचे कौतुकही केलं जात आहे.