सोलापूर : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे नाजरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. तेथून परतताना त्यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला एका दुचाकीस्वार वेगाने धडकल्याने त्याचा जाागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आमदार शहाजी बापू पाटील हे शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगोला शहराकडे येत होते. त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस संरक्षक गाडीचा ताफा होता. त्यांचा ताफा माळीवाडी नाजरा येथे आला असता त्याच दरम्यान आमदाराच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस गाडीवर दुचाकी स्वार येऊन धडकला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

पती हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत करत होता व्हॅलेंटाइन वीक साजरा, पत्नीने पकडून बदड बदड बदडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here