वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांना विमान प्रवासाचा अनुभव आणि KAVACH तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा असणाऱ्या सुविधा देत आहे. या ट्रेनमधील एक्झिक्युटिव्ह क्लासच्या डब्यांमध्ये १८० अंश फिरणाऱ्या आसनांच्या अतिरिक्त वैशिष्ट्यांसह आसनांची खास सोय आहे. प्रत्येक कोचमध्ये ३२ इंची स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यात प्रवाशांची माहिती आणि इन्फोटेनमेंट देण्यात येईल. दिव्यांगांसाठी खास सुविधा या वंदे भारतमध्ये आहे. चांगल्या स्वच्छतागृहांसह, दिव्यांगांसाठी ब्रेल अक्षरात असलेले आसन हँडल आणि आसन क्रमांक देण्यात आले आहेत. जंतू-मुक्त हवेसाठी अल्ट्रा व्हायोलेटसह सूक्ष्म उष्मा वेंटिलेशन आणि वातानुकूलित नियंत्रण उच्च कार्यक्षमतेचे कॉम्प्रेसर आहेत.

वंदे भारत ट्रेन

वंदे भारत ट्रेन

वंदे भारतमध्ये टच फ्री सुविधांसह व्हॅक्यूम टॉयलेट, इलेक्ट्रिकल क्युबिकल्स आणि टॉयलेटमध्ये एरोसोल आधारित फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टमसह खास अग्निसुरक्षा देण्यात आली आहे. ही स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस मेक इन इंडियाचा भाग असून चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी, पेरांबूर इथे तयार करण्यात आली आहे. ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन आहे.

मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सोलापूर दरम्यान या ट्रेनमुळे कनेक्टिव्हिटी वाढेल. सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी यांसारख्या तीर्थक्षेत्रांसाठी जलद कनेक्टिव्हिटी होईल. सध्याच्या ट्रेनला जवळपास ७ तास ५५ मिनिटांचा वेळ लागतो, तर वंदे भारत ट्रेन साडे सहा तासांत पोहोचू शकेल. या ट्रेनमुळे पर्यटन स्थळं आणि पुण्यासारख्या शैक्षणिक हबला चालाना मिळण्यास मदत होईल.

मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई – साईनगर शिर्डी ही देशातील दहावी वंदे भारत ट्रेन आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि साईनगर शिर्डी दरम्यान ही ट्रेन चालवली जाईल. नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी इथे कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल. महाराष्ट्रात दोन आंतरराज्यीय आणि दोन राज्यांतर्गत अशा चार वंदे भारत गाड्या चालतील.

वंदे भारतची खास वैशिष्ट्यं?

वंदे भारतची खास वैशिष्ट्यं?

वंदे भारत स्वदेशी बनावटीची ट्रेन असून सेमी-हाय स्पीड, सेल्फ-प्रोपेल्ड ट्रेन आहे. या ट्रेनचा १४० सेकंदात १६० किमी ताशी इतका वेग आहे. प्रवाशांसाठी आरामदायी आसन व्यवस्था यात करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये स्लाइडिंग फूटस्टेप्स, स्वयंचलित दरवाजे आणि टच फ्री स्लाइडिंग दरवाजे देण्यात आले आहेत. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्व्हिंग सीट्स देण्यात आल्या आहेत. दिव्यांगांसाठी विशेष शौचालयाची सोय करण्यात आली आहे.

हायटेक सुविधा

हायटेक सुविधा

टच-फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट, ब्रेल लिपीमध्ये सीट क्रमांक देण्यात आले आहेत. प्रत्येक कोचमध्ये ४ आपत्कालीन खिडक्या आहेत. तसंच ४ कॅमेरे देण्यात आले असून यात कोचच्या बाहेर, मागील दृश्य दिसू शकतील. इमर्जन्सी टॉक बॅक युनिट्स देण्यात आले आहेत. ड्रायव्हर-गार्डसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉइस रेकॉर्डिंग सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक डब्ब्यात आपत्कालीन प्रकाश व्यवस्था देण्यात आली आहे. त्याशिवाय इलेक्ट्रिकल उपकरणांसाठी फ्लड प्रूफिंग सुविधा आहे. ६५० मिमी उंचीपर्यंत पूरातही या उपकरणांची सुरक्षा केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here