मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या चाचणीत नवीन ट्विस्ट आला आहे. सुशांतच्या वडिलांना यांनी आणि काही अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केली आहे. बिहार पोलिसांना देण्यात आलेल्या सात पानी रिपोर्टमध्ये त्यांनी रियावर धोकेबाजी, आत्महत्येसाठी उकसावणं यासहित अनेक गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे हे आरोप सुशांतच्या मृत्यूच्या जवळपास दिड महिन्यांनंतर करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबियातील सर्वांचे जबाब नोंदवून घेतले होते. यावेळी कोणीही रियाचं नाव घेतलं नव्हतं.

पहिल्यांदा कोणालाच नव्हता रियावर संशय
सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास दिड महिन्यांनी त्याच्या घरातल्यांनी या प्रकरणावर भाष्य करत रियाविरोधात एफआयआर दाखल केली. सुशांतच्या बहिणीने श्वेताने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, सत्य समोर आलं पाहिजे आणि सुशांतला न्याय मिळाला पाहिजे. मुंबई पोलीस पहिल्यापासून सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सर्व गोष्टी तपासून पाहत आहे. खासगी आयुष्यापासून ते सिनेमांपर्यंत सर्वच गोष्टींकडे पोलीस बारकाईने लक्ष देत आहेत. एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुशांतच्या कुटुंबियांचे जबाब याआधी घेण्यात आले होते. त्यावेळी कोणीही रियाचं नाव घेतलं नाही. याउलट अनेकदा त्यांना रियाचं नाव घेऊन प्रश्नही विचारण्यात आले होते. पण तरीही कोणीही रियाचं नाव घेतलं नव्हतं.

सुशांतच्या कंपन्यांचीही होणार चौकशी

रिपोर्टनुसार, सुशांतचे वडील आणि बहिणीचा नवरा (भावजी) मुंबई पोलिसांच्या जॉइन्ट सीपी (लॉ अँड ऑर्डर) यांनाही भेटले होते. पण सुरुवातीला अशा प्रकारचा संशय असल्याचा त्यांनी कधीच उल्लेख केला नव्हता. मुंबई पोलीस अजूनही त्याच्या तीन कंपन्यांची चौकशी करत आहे. यातील काही कंपन्यांमध्ये रिया आणि तिच्या भावाची शॉविकची भागीदारीही होती.

सुशांतनेच कंपन्यांवर केला होता सारा खर्च

पोलिसांच्या रिपोर्टनुसार सुरुवातीला रियाच्या भावाची चौकशी करण्यात येणार होती. कारण दोघांनी मिळून कंपनी स्थापन केली असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण या कंपन्यांमध्ये सर्व पैसा सुशांतचाच होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

8 COMMENTS

  1. Thanks for every other informative site. The place else may just I get that kind of info written in such an ideal means? I’ve a undertaking that I’m simply now working on, and I’ve been on the look out for such information.

    my homepage : okbet online casino

  2. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here