नवी दिल्ली : उद्योजक गौतम अदानी यांच्या समोरील अडचणी कमी होत नसल्याचं चित्र आहे. अदानी उद्योग समुहापुढील अडचणीत वाढ झाली आहे.नॉर्वे वेल्थ फंडनं अदानींच्या कंपन्यांतील त्यांचा हिस्सा विकला आहे. नॉर्वेच्या 1.35 लाख कोटी डॉलरच्या वेल्थ फंडनं काही आठवड्यापूर्वी अदानी ग्रुपच्या कंपन्यांमधील त्यांचे शेअर्स विकल्याचं सांगितलं आहे. नॉर्वे वेल्थ फंडमध्ये इएसजी रिस्क मॉनिटरिंगचे प्रमुख क्रिस्टोफर राइट यांनी आम्ही कित्येक वर्षापासून इएसजी इश्यूज च्या मुद्यावर अदानी ग्रुपचं नियंत्रण केलं आहे. फंडानं २०१४ ते २०२२ च्या अखेरपर्यंत अदानी उद्योग समुहातील ५ कंपन्यांमधील त्यांचे शेअर्स विकले आहेत. नॉर्वे वेल्थनं फंडने अदानी पोर्टसह इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती.

२०२२ च्या अखेरीस शेअर्सची विक्री

क्रिस्टोफर यांनी २०२२ च्या अखेरीपासून आम्ही अदानी ग्रुपच्या कंपन्यांमधील भागिदारी कमी केल्याचं सांगितलं. आता आमच्याकडे अदानींच्या कंपन्याचे शेअर्स नाहीत, असं त्यांनी सांगितलं. २०२२ च्या अखेरपर्यंत नॉर्वे वेल्थ फंडकडे अदानी ग्रीन एनर्जीचे ५२.७ दशलक्ष डॉलर्सचे शेअर्स होते.अदानी टोटल गॅसमध्ये ८३.६ दशलक्ष डॉलर्स ची भागिदारी होती. तर, अदानी पोर्टमध्ये ६३.७ दशलक्ष डॉलर्सची भागिदारी होती.

सिद्धार्थ मल्होत्राच्या फोटोवर एक्स गर्लफ्रेंडची कमेंट, त्यावर कियारा अडवाणीचा ‘लक्षवेधी रिप्लाय’, म्हणते…

अदानी ग्रुपला धक्के सुरुच

अदानी ग्रुपला सातत्यानं धक्के बसत आहेत. अदानी उद्योग समुहातील सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार असलेल्या फ्रान्समधील टोटल एनर्जीजनं अदानी ग्रुपच्या हायड्रोजन प्रकल्पातील भागिदारी थांबवली असल्याचं म्हटलं होतं. हिंडेनबर्गनं केलेल्या आरोपांवरील स्पष्टीकरणाची आम्ही वाट पाहत आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं. एमएससीआयनं पब्लिक मार्केट ट्रेडमध्ये असलेल्या अदानी समुहाशी संबंधित शेअर्सच्या संख्येचा फेर आढावा करण्याची घोषणा केली आहे. यामुळं आज अदानी समुहाच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

बैल अंगावर पडल्याने गुदमरला, मुक्या प्राण्यांना जीव लावणाऱ्या तरुणाची चटका लावणारी एक्झिट

अदानींच्या शेअर्समध्ये घसरण

अदानी उद्योग समुहाच्या शेअर्समध्ये आज घसरण पाहायला मिळाली. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये १०.७२ टक्केंची घसरण झाली. अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये २.९० टक्क्यांची घसरण झाली. अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटलच्या शेअर्सला लोअर सर्किट लागलं. अदानी ग्रीनचा शेअर ४.९६ टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

नाना पटोले हे डेअरिंगबाज, पण त्यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडलं नसतं तर मविआ सरकार पडलं नसतं : यशोमती ठाकूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here